शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील जखमी विकी दाहिजेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2016 23:14 IST

अपघातातील जखमी विकी दाहिजेचा मृत्यू

नाशिक : दिंडोरी रोडवरील पिंपळणारे फाट्यावर स्विफ्ट कारने लोखंडी सळया घेऊन जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत कारमधील गंभीर जखमी विकी मधुकर दाहिजे (२२, आम्रपाली झोपडपट्टी) या तरुणाचा सोमवारी पहाटे उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला़ या अपघातात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून, एकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़रविवारी सायंकाळच्या सुमारास नितीन जाधव, गोरख ठोंबरे, विकी दाहिजे, आसाराम ढाकणे हे स्विफ्ट कारने (एमएच १५, सीटी ५९००) वणीहून नाशिकला येत होते़ साडेसात वाजेच्या सुमारास पिंपळणारे फाट्यावर नाशिककडे लोखंडी सळया (स्टिल) घेऊन जाणाऱ्या ट्रकवर ही भरधाव स्विफ्ट कार पाठीमागून धडकली़ या अपघातात मनसे नगरसेवक माधुरी जाधव यांचे दीर नितीन जाधव व गोरख ठोंबरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर विकी दाहिजे व आसाराम ढाकणे हे दोघे गंभीर जखमी झाले होते़ या दोघा जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास विकी दाहिजे याचा मृत्यू झाला़ तर जखमी आसाराम ढाकणे याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ (प्रतिनिधी)