दुचाकी अपघातात पत्नी ठार; पती जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:23 IST2020-05-18T00:21:42+5:302020-05-18T00:23:00+5:30
उड्डाणपुलावरून रविवारी दुपारी चेहेडी पंपिंग येथे दुचाकीवर जाणाऱ्या पती-पत्नीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मारु ती कारने धडक दिल्याने दोघे पती-पत्नी उड्डाणपुलावरून खाली पडल्याने यात नीता पागधरे यांचा मृत्यू झाला.

दुचाकी अपघातात पत्नी ठार; पती जखमी
नाशिकरोड : येथील उड्डाणपुलावरून रविवारी दुपारी चेहेडी पंपिंग येथे दुचाकीवर जाणाऱ्या पती-पत्नीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मारु ती कारने धडक दिल्याने दोघे पती-पत्नी उड्डाणपुलावरून खाली पडल्याने यात नीता पागधरे यांचा मृत्यू झाला.
चेहेडी पंपिंग खर्जुल मळा येथे राहणारे बीवायके महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रसाद लक्ष्मण पागधरे (३४) हे पत्नी नीता (३३) हिच्यासोबत रविवारी नाशिकरोड येथे खरेदीसाठी गेले होते. खरेदी आटोपून ते दुचाकी (एमएच०१/एवाय/३५५९)ने उड्डाणपुलावरून सिन्नरफाट्याच्या दिशेने घरी जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेली मारुती कार (एमएच१५/आर/४६३०) ने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघे पती-पत्नी उड्डाणपुलाच्या खाली पडले. अपघातानंतर कारचालक पळून गेला. यावेळी परिसरातील नागरिकांनी दोघा जखमींना रुग्णवाहिकेतून बिटको
रु ग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच नीता यांची प्राणज्योत मालवली. मयत नीता यांना दहा वर्षांची मुलगी आहे.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॅमरोडला गाडी सापडली
अपघातानंतर फरार झालेला कारचालकाने लॅमरोडवरील निकी सागर हॉटेलशेजारील नाल्याजवळ कार सोडून पलायन केले. कारमध्ये दारूच्या बाटल्या व ग्लास आढळून आले.