शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रुंदीकरणाचा प्रस्ताव

By admin | Updated: November 11, 2014 00:50 IST

वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रुंदीकरणाचा प्रस्ताव

नाशिक : शहरातील अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोकस्तंभ-रविवार कारंजा रस्त्याच्या कॉँक्रिटीकरणाचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले असून, या पार्श्वभूमीवर येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रुंदीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता; मात्र रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत विरोधाच्या भूमिकेवर येथील मिळकतधारक व व्यापारी वर्ग ठाम असून, सोमवारी (दि. १०) झालेल्या अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्येही उपस्थितांनी रुंदीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविण्यात आला.विकास आराखड्यामध्ये रविवार पेठ रस्ता रुंदीकरण व कॉँक्रिटीकरणाचा प्रस्ताव असून, सुमारे पंधरा मीटरपर्यंत हा रस्ता विकास आराखड्यामध्ये दाखविण्यात आला आहे; मात्र दुतर्फा असलेली व्यापाऱ्यांची दुकाने व रहिवाशांची घरे यामुळे सद्यस्थितीत रस्ता केवळ आठ मीटरपर्यंत उपलब्ध असून, तोदेखील अशोकस्तंभ ते रविवार कारंजापर्यंत कमी अधिक असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जेवढा रस्ता उपलब्ध होईल तेवढ्या जागेचे अन्य सोयीसुविधांसाठी जागा सोडून कॉँक्रिटीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात के ली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने बैठकीमध्ये स्पष्ट केले. कॉँक्रिटीकरणादरम्यान कोणत्याही प्रकारची सक्ती व्यापारी व रहिवाशांवर केली जाणार नाही. जेवढी जागा मिळेल त्या जागेवर रस्त्याचे कॉँक्रिटीकरण करण्यात येईल. जर कोणी स्वेच्छेने जागा उपलब्ध करून दिली तर महापालिका संबंधितांचे स्वागत करेल व त्या ठिकाणी शक्य असल्यास कॉँक्रिटीकरण किंवा पेव्हर ब्लॉक बसविले जातील, असे माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी स्पष्ट केले. व्यापारी, मिळकतधारक व महापालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी आपली मते मांडली. यावेळी बहुसंख्य व्यापाऱ्यांनी रस्ता रुंदीकरणाला हरकत घेत विरोध दर्शविला, तर बोटावर मोजण्याइतक्या व्यापाऱ्यांनी व रहिवाशांनी रस्ता रुंदीकरणाचे समर्थन केले. (प्रतिनिधी)