शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानात कोणती महापालिका मारणार बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 07:18 IST

Swachh Bharat Abhiyan : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

- संजय पाठकनाशिक - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. कोरोनामुळे यंदा मार्च महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी मागील काळातील उणिवा दूर करण्यासाठी सर्वच महापालिकांमध्ये धावपळ सुरू आहे. नाशिक महापालिकेनेही झीरो गारबेजसाठी अगदी खडी, ढबरचे रस्ते तयार करण्यापासून अस्वच्छता करणाऱ्यांना दंडाबरोबरच समाजसेवा करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे बऱ्याच अंशी शहर स्वच्छतेस मदत झाली आहे.नाशिक महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन अत्यंत उत्तम असले तरी केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात अपेक्षित यश महापालिकेला मिळाले नाही. सुरुवातीला देशातील ६७ आणि ६४ असे क्रमांक मिळविले. अर्थात, केंद्र शासनाचे नियम आणि निकष सातत्यने बदलत असल्याने त्या- त्या वर्षी या नियमांची पूर्तता करणे आव्हानात्मक ठरत आहे. गेल्या वर्षीपासून तीन महिन्यांनी सर्वेक्षण आणि स्वयंमूल्यांकन अशी पद्धती करण्यात आली आहे. त्यावेळी नाशिक महापालिकेला वर्षाअखेरीस धुळे महापालिकेपेक्षा कमी म्हणजे, सिंगल स्टार मानांकन मिळाले. तर अंतिम सर्वेक्षणात मुसंडी मारून देशात अकरावा क्रमांक मिळविला. आता टॉप फाईव्हसाठी महापालिकेने तयारी केली आहे.  स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी धुळे महापालिकेने सक्रीय सहभाग नोंदवित अभिनव प्रयोग करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. वर्दळीच्या ठिकाणी कचराकुंडी ठेवणे आणि कचरा संकलनासाठी सुमारे १०० घंटागाड्यांचे नियोजन केले आहे. नाशिक विभागीय पातळीवरुन महापालिका स्तरावर स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे. नगरसेवकांशी समन्वय साधून चौक निश्चित करणे आणि सर्व भागात घंटागाडी पोहोचेल, याकडे बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. जळगाव महापालिका देशात ६४ व्या स्थानावर तर राज्यातील ३३ महापालिकांमध्ये २० व्या स्थानावर आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांच्या रेटिंग स्पर्धेतही जळगावला ३ स्टार दिले आहेत. नाशिक, अहमदनगरसारख्या मोठ्या शहरांना केवळ एकच स्टार मिळाला आहे. महापालिकेकडून अजूनही कचऱ्यावर पूर्णपणे प्रक्रिया केली जात नसून, घनकचरा प्रकल्प आठ वर्षांपासून बंद आहे. स्टार रेटिंग व स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत ६०० गुणांचे नुकसान झाले. घंटागाड्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ओला व सुक्या कचऱ्याचे संकलन नियमित होते.  नागरिकांच्या कल्पकतेला वावनाशिक महापालिकेच्या वतीने स्वच्छतेसाठी प्रयेागशीलतेला वाव देण्यात येत असून घरगुती ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याबरोबरच अन्य वेगळे प्रकल्प राबविणाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.  लॉकडाऊन केल्यानंतर नाशिकमार्गे जाणाऱ्या प्ररप्रांतीयांनी टाकलेल्या प्लास्टिक पिशव्या घेऊन पोलिसांच्या बॅरिकेटवर शोभिवंत झाडे लावणारा पेालीस कर्मचारी सचिन जाधव आणि घरगुती कचऱ्यापासून स्वयंपाकासाठी बायोगॅस तयार करणाऱ्या प्रकल्पांची महापालिकेने निवड केली आहे. अहमदनगर : घातक कचऱ्याचे स्वतंत्र संकलनअहमदनगर महापालिकेने घरातील घातक कचऱ्याचे संकलन करण्याचा उपक्रम हाती घेतला असून, घंटागाडीत स्वतंत्र पेटीची व्यवस्था केली आहे. बांधकाम साहित्याचा पुर्नवापर करण्यात येत आहे. मागील वर्षी स्वच्छतेत अहदमनगर शहराने देशात ४० वा क्रमांक पटकविला. त्यामुळे महापालिकेला मानाचे ‘थ्री स्टार’ मानांकन मिळाले. यंदा महापालिकेने ‘५-स्टार’साठी नोंदणी केली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNashikनाशिक