शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

कोठे धसका, कोठे बार फुसका

By admin | Updated: January 19, 2015 00:25 IST

अतिक्रमणविरोधी मोहीम : गंगापूररोडला व्यावसायिक पुन्हा झाले निर्धास्त, जागांवर कब्जा

कोठे धसका, कोठे बार फुसकाअतिक्रमणविरोधी मोहीम : गंगापूररोडला व्यावसायिक पुन्हा झाले निर्धास्त, जागांवर कब्जानाशिक : महापालिकेमार्फत सोमवारपासून (दि.१९) पुन्हा एकदा अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली जाणार असल्याने अतिक्रमणधारकांनी धसका घेत स्वत:हून बांधकाम हटविण्यास सुरुवात केली असताना दुसरीकडे दोन आठवड्यांपूर्वी पालिकेने मोहीम राबविल्यानंतर गंगापूररोडला मात्र व्यावसायिक व नागरिकांनी निर्धास्त राहत पुन्हा एकदा वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत सामासिक अंतरातील वाहनतळांच्या जागांवर आपला कब्जा जमविला आहे. त्यामुळे गंगापूररोडवरील मोहिमेचा बार फुसकाच ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नागरिक व व्यावसायिकांना स्वत:हून अतिक्रमित बांधकाम काढून घेता यावे यासाठी आठ दिवस मोहीम थांबविली होती. या कालावधीत शहरातील सहाही विभागांत सुमारे दोन हजार अतिक्रमित बांधकामांवर रेड मार्किंग करण्याचे काम नगररचना व बांधकाम विभागाने केले. या रेड मार्किंगमुळे मोहिमेच्या वेळी नुकसान होण्याचा धसका घेत लगेचच अनेक व्यावसायिक व नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली. आयुक्तांनी सोमवारपासून पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्याची घोषणा केल्यानंतर रविवारी सुटीच्या दिवशीही अनेक व्यावसायिक व नागरिकांनी अतिक्रमित बांधकाम स्वत:हून हटविण्यावर भर दिला. अतिक्रमण विरोधी मोहिमेचा एकीकडे नागरिक व व्यावसायिकांनी धसका घेतला असताना दुसरीकडे महापालिकेने गंगापूररोडवर राबविलेल्या मोहिमेला दोन आठवडे उलटत नाही तोच पुन्हा एकदा व्यावसायिकांनी जागांवर वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत कब्जा जमविला आहे. महापालिकेने मविप्र मॅरेथॉन चौक ते सोमेश्वरपर्यंत दुतर्फा असलेली अनेक व्यावसायिक, हॉटेल्स यांच्या अतिक्रमित बांधकामांवर जेसीबी चालविला होता. त्यात काही हॉटेल्स व्यावसायिकांनी स्वत:हून बांधकाम काढून घेण्याची विनंती केल्याने महापालिकेने तोडफोड केली नव्हती, परंतु मोहिमेनंतर काही व्यावसायिकांनी पुन्हा एकदा जागांवर कब्जा जमविताना आपले साहित्य बाहेर मांडून ठेवले आहे. एका हॉटेलचालकाने तर मोहिमेच्या वेळी अतिक्रमित बांधकामांवरील कौले काढण्याचे नाटक दाखविले, परंतु मोहिमेनंतर पुन्हा एकदा बांधकाम ‘जैसे थे’ आहे. हॉटेल दूर्वांकुरचे अतिक्रमित शेड पाडण्यात आले होते. परंतु हॉटेलचालकाने क्लृप्ती शोधत परत त्याच जागेवर चोहोबाजूने झाडांच्या कुंड्या ठेवत त्यात किचन उभारले आहे, तर हॉटेल रेडचिलीमध्येही शेडचे बांधकाम ‘जैसे थे’ आहे. साई साया फास्ट फूडचालकानेही तात्पुरत्या स्वरूपात कापडी तंबू तयार करून तेथेच पुन्हा कब्जा जमविला आहे. जितेंद्र वर्ल्ड या शोरुमचेही बाहेर आलेला नामफलक हटविण्यात आला होता, परंतु शोरुममालकाने स्वत:हून फलक हटविण्याची विनंती केल्यानंतर तोडफोड थांबविण्यात आली होती, परंतु आता फलकाचे बांधकाम न हटविता पुन्हा एकदा तात्पुरत्या स्वरूपात फलक उभारण्यात आला आहे. गंगापूररोडवर काही व्यावसायिकांनी निर्धास्त होत पुन्हा एकदा जागांवर कब्जा मिळविल्याने महापालिकेच्या मोहिमेचा बार फुसका ठरल्याचे चित्र दिसून येते. (प्रतिनिधी)