शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाचा निधी मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:42 IST

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पंतप्रधान घरकुल योजना व रमाई घरकुल आवास योजनेचा निधी संपल्यामुळे ऐन पावसाळा जवळ आला असताना अर्धवट स्थितीतील हक्काचा निवारा कधी पूर्ण होणार याच्या प्रतीक्षेत लाभार्थी आहेत. प्रत्येकाला हक्काचे घरकुल देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पंतप्रधान घरकुल योजना व रमाई घरकुल आवास योजनेचा निधी संपल्यामुळे ऐन पावसाळाजवळ आला असताना अर्धवट स्थितीतील हक्काचा निवारा कधी पूर्ण होणार याच्या प्रतीक्षेत लाभार्थी आहेत.प्रत्येकाला हक्काचे घरकुल देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र, या हक्काच्या घरकुलांना निधीचा ब्रेक लागला आहे. योजनेच्या खात्यावर पैसेच नसल्याने लाभार्थ्यांची मोठी अडचणनिर्माण झाली आहे. अनुदानाअभवी कामाच्या ऐन घाईत घरांचे बांधकाम बंद ठेवण्याची वेळ त्यांच्यावरआली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना पैशासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.रमाई आवास घरकुल लाभार्थ्यांना पिहल्या हप्त्यात घरकुलाच्या पायाचे बांधकाम करून ठेवले आहे. मात्र, दोन मिहने उलटूनही लाभार्थ्यांना घरकुलाचा दुसराहप्ता मिळत नसल्याने तालुक्यातील घरकुल लाभार्थी अडचणीतसापडले आहेत. दुसर्याच हप्त्याला एवढा वेळ तर तिसरा, चौथा कधी मिळणार आणि घरकुल पूर्ण कधी होणार? या चिंतेत लाभार्थी सापडले आहेत.खात्यावर अनुदानाची रक्कम जमा न झाल्याने पंचायत समितीचे हेलपाटे मारावे लागत आहेत. घरकुल योजनेचा निधी तातडीने उपलब्ध करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.------------------------------------------------------शासनाकडून गरीब आणि कुडामातीच्या घरात राहणार्या लाभार्थ्यांना पंतप्रधान घरकुल व रमाई आवास घरकुल योजनेमधून घरकुल दिले जाते. मात्र, घरकुलाचा हप्ता वेळेवर मिळत नसल्याने काम पूर्ण कसे करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुळात हा काळ बांधकाम पूर्ण करण्याचा असतो. काही दिवसानंतर पावसाचा धोका असल्याने लवकर बांधकाम पूर्ण करण्याकडे लाभार्थ्यांचा कल असतो. मात्र, योजनेच्या खात्यावर पैसेच उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना पैसे मिळेना झाले आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिक