चांदोरी : निफाड तालुक्यात थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. चांदोरी व परिसरात शेत वलव्हणी करून गहू पेरणीला सुरुवात झाली आहे. गहू पेरणी नोव्हेंबरच्या अखेरीस व डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू होत असते; पण पाण्याच्या उपलब्धतेनुसार यावर्षी खूप लवकर पेरणी करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.यावर्षी पावसाने पाठ फिरविली असून, शेतीसाठी पाण्याचा उपलब्ध साठा लक्षात घेऊन व धरणातून येणाºया आवर्तनाचा अंदाज घेऊन यावर्षी शेतकºयांनी खरीप हंगामातील पिके आवरून लगेच गहू, हरभरा, मका, कांदा या रब्बी पिकांची लवकर लागवड केली आहे.गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक असून, शेतकºयांनीशेत तयार करून व त्यामध्येट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली जात आहे. यावेळी पाण्याच्या कमतरतेमुळे शेत न वल्व्हता पेरणी केली जातआहे.गव्हाचे बियाणे एकरी सरासरी ५० ते ७० किलो लागते त्यासाठी त्यांना किलोसाठी ३५ ते ४० रु पये मोजावे लागत आहे.गव्हाच्या अजित १०२, लोकवन, श्रीराम १११, आर्या १०६, दिनकर (दिवाणी ७), त्र्यंबक आदी बियाण्यांच्या जाती बाजारामध्ये उपलब्ध आहेत. ट्रॅक्टर पेरणीसाठी वाढत्या महागाई मुळे शेतकºयांना एकरी १३०० ते १५०० रु पये मोजावे लागत आहेत. गहूपिकासाठी लागणारा खर्च लक्षात घेत चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.पावसाने पाठ फिरविल्याने पुढील काही महिन्यांमध्ये निर्माण होणारे पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी गहू पेरणीला लवकरात लवकर सुरुवात केली आहे. जे बियाणे कमी पाण्यात जास्त उत्पन्न देईल त्या बियाणांचा वापर होत आहे.- विजय सावंत, स्थानिक शेतकरी
चांदोरी परिसरात गहू पेरणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:40 IST
चांदोरी : निफाड तालुक्यात थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. चांदोरी व परिसरात शेत वलव्हणी करून गहू पेरणीला सुरुवात झाली आहे. गहू पेरणी नोव्हेंबरच्या अखेरीस व डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू होत असते; पण पाण्याच्या उपलब्धतेनुसार यावर्षी खूप लवकर पेरणी करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.
चांदोरी परिसरात गहू पेरणीला वेग
ठळक मुद्देयंदाच्या वर्षी गहू पेरणीला लवकरात लवकर सुरुवात