शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

यंदा पूर्व प्रभागसभापतिपदी कुणाची वर्णी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 1:04 AM

राज्यात भाजपा आणि सेना युती झाल्याने आता महापालिकेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार आहे.

इंदिरानगर : राज्यात भाजपा आणि सेना युती झाल्याने आता महापालिकेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार आहे. तथापि, पूर्व प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने भाजपाचाच सभापती होणार हे निश्चित असल्याचे मानले जात आहे.सलग पाच वर्ष भाजपचाच सभापती होणार आहे. पूर्व विभागात पाच प्रभाग असून, या प्रभागात १४, १५, १६, २३ व ३० या प्रभागांचा समावेश आहे. या पाच प्रभागातील एकोणावीस नगरसेवकांमध्ये भाजपाचे बारा, राष्ट्रवादीचे चार, काँग्रेसचे दोन आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाच्या नगरसेवकांमध्ये सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, अ‍ॅड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा, उपमहापौर प्रथमेश गिते, सुमन भालेराव, अनिल ताजनपुरे, अर्चना थोरात आदींचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून सुफियान जीन, समीना मेमन, सुषमा पगारे, शोभा साबळे, तर काँग्रेसचे राहुल दिवे, आशा तडवी, अपक्ष मुशीर सय्यद असे सदस्यांचे पक्षीय बलाबल आहे. भाजपाकडून नवीन चेहऱ्यांपैकी प्रथमेश गिते यांना उपमहापौर व श्याम बडोदे यांना स्थायी समितीवर आणि शाहीन मिर्झा, सुमन भालेराव यांना पूर्व प्रभाग सभापतीवर संधी देण्यात आली. त्यामुळे यंदा अनिल ताजनपुरे, सुप्रिया खोडे, अर्चना थोरात आदींना अद्याप कोणतेही पद मिळाले नाही. त्यांच्यापैकी एकाची सभापती वर्णी लागण्याची शक्यता आहे.पहिल्यांदाच पाच वर्षे एकाच पक्षाचा सभापतीपूर्व विभागात आतापर्यंत कोणत्याही एका पक्षाला बहुमत प्राप्त झाले नव्हते. दरवेळी आघाडी किंवा युती ची सत्ता असल्याने वेगवेगळ्या पक्षांचा सभापती विराजमान झालेला आहे. त्यातच काही अपक्षांनीही सभापती पद भूषवले आहे. प्रत्येक वेळी आकड्यांची जुळवाजुळव करावी लागत आलेली आहे. भाजपाला पूर्ण बहुमत असल्याने पाचव्या वर्षी भाजपाचा सभापती या प्रभाग समितीवर होणार असून, हा समितीच्या दृष्टीने वेगळा विक्रम आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक