बहुचर्चित बालाजी देवस्थान जमीनदोस्त

By Admin | Updated: November 19, 2016 00:02 IST2016-11-19T00:04:47+5:302016-11-19T00:02:18+5:30

मनपाची कारवाई : भाविकांचा विरोध, गिरीश मुदलियारसह १५ जण ताब्यात

The well known Balaji Devasthan rampage | बहुचर्चित बालाजी देवस्थान जमीनदोस्त

बहुचर्चित बालाजी देवस्थान जमीनदोस्त

 नाशिकरोड : मनपाच्या शिखरेवाडी मैदानाजवळ महापालिकेच्या जागेत बालाजी सोशल फाउंडेशनने उभारलेले बहुचर्चित श्री बालाजी देवस्थान मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी जमीनदोस्त केले. भाविक व महिलांचा किरकोळ विरोध वगळता मंदिर हटविण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गिरीश मुदलियारसह १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिखरेवाडी अजिंठानगरी मनपाच्या मैदानालगत बालाजी सोशल फाउंडेशनचे कैलास मुदलियार यांनी काही वर्षांपूर्वी प्रति बालाजी मंदिराप्रमाणे श्री बालाजी देवस्थान उभारले होते.

Web Title: The well known Balaji Devasthan rampage