वणीत कोरोनामुक्त दाम्पत्याचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 11:08 PM2020-06-27T23:08:17+5:302020-06-27T23:08:37+5:30

वणी : आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे दाम्पत्य कोरोनामुक्त झाल्याने त्यांचे गावात आगमन होताच पुष्पवृष्टी करून नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.

Welcome to Wani Coronamukta couple | वणीत कोरोनामुक्त दाम्पत्याचे स्वागत

वणीत कोरोनामुक्त दाम्पत्याचे स्वागत

Next
ठळक मुद्देशहरवासीयांची व प्रशासकीय यंत्रणेची अनामिक भीती दूर झाली

वणी : आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे दाम्पत्य कोरोनामुक्त झाल्याने त्यांचे गावात आगमन होताच पुष्पवृष्टी करून नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.
शहरातील मानसी बिल्डिंगलगत असलेल्या अपार्टमेंटमधील ४६ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यापाठोपाठ त्यांची ४० वर्षीय पत्नी कोरोनाबाधित झाली होती. दोघांवर उपचार सुरू असताना वणी शहरात चिंतेचे वातावरण होते व ते वास्तव्य असलेली इमारत सील करण्यात आली होती. या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या ४५ जणांना क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. त्यांच्या दैनंदिन व आवश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी आरोग्य विभाग, ग्रामपालिका, महसूल व पोलीस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. बाहेरील व्यक्तींना आत प्रवेश नाही व आतील व्यक्तींना बाहेर जाण्यास प्रतिबंध अशी खबरदारी घेण्यात आली होती. दरम्यानच्या कालावधीत या दाम्पत्याची दुसरी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात या दोघांचा अहवाल निगेटिव्ह आला. ही माहिती वणीत पोहोचताच शहरवासीयांची व प्रशासकीय यंत्रणेची अनामिक भीती दूर झाली व ताणतणाव नाहीसा झाला. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी या दाम्पत्याला रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. संताजी चौकात त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, सदर इमारत दाम्पत्याच्या प्रवेशानंतर २८ दिवस ही इमारत सील करण्यात आली असून, प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेशाची परवानगी नाकारण्यात आली आहे.

Web Title: Welcome to Wani Coronamukta couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.