शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:46 IST

नवीन वर्षाचे सर्वत्र पाश्चिमात्य पद्धतीने स्वागत होत असताना तालुक्यातील देवपूर येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करीत नववर्षाचे स्वागत केले. महाराष्ट्रीयन संस्कृतीचे जतन करतानाच विद्यार्थ्यांनी अभिनयातून उपस्थितांचे उद्बोधनही केले.

ठळक मुद्देमहाराष्टÑीयन संस्कृ तीचे उद्बोधन : व्यसनमुक्तीची शपथ घेत विद्यार्थ्यांकडून प्रभातफेरी

सिन्नर : नवीन वर्षाचे सर्वत्र पाश्चिमात्य पद्धतीने स्वागत होत असताना तालुक्यातील देवपूर येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करीत नववर्षाचे स्वागत केले. महाराष्ट्रीयन संस्कृतीचे जतन करतानाच विद्यार्थ्यांनी अभिनयातून उपस्थितांचे उद्बोधनही केले.मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमाने आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या येसूबाई, मासाहेब जिजामाता यांच्या वेशभूषा तनुजा खोले, दुर्गा गडाख, गौरी गाडेकर, सोनाल कांबळे, वृषाली गडाख या विद्यार्थिनींनी साकारल्या. झाशीच्या राणीची वेशभूषा ईश्वरी गडाख, साक्षी गडाख, अदिती खोले, कावेरी खोले या विद्यार्थिनींनी केली होती. बाळूमामाची वेशभूषा प्रणव पाटील, तर ओमकार गडाख या विद्यार्थ्यांने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा केली होती. तनुजा गडाख परीच्या पेहरावात वावरताना दिसली. कृतज्ञता बोºहाडे, समीक्षा घरटे या विद्यार्थिनींचेही पेहराव लक्षवेधी होते. यासाठी प्राचार्य आर. वाय. मोगल, सुमन मुंगसे, श्रीहरी सैंद्रे, सुनील पगार, वैशाली पाटील, दत्तात्रय आदिक, प्रमोद बधान, ताराबाई व्यवहारे, शंकर गुरुळे, मीननाथ जाधव, गणेश मालपाणी, राजेश आहेर, नानासाहेब खुळे, रवींद्र गडाख, सोपान गडाख, सुवर्णा मोगल, बाबासाहेब गुरूळे, विलास पाटील, नारायण भालेराव, अशोक कळंबे, सतीश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दुर्गा उगले व समृद्धी नरोडे यांनी केले.इगतपुरीत दूध वाटपइगतपुरी : नववर्षाचे औचित्य साधून जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने दूध वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी तहसीलदार अर्चना भाकड, प्रवीण अलई, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, रेल्वे सुरक्षा बलाचे अधीक्षक एस. एस. बर्वे, लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, एसएमबीटीचे अधिकारी डॉ. प्रदीप नाईक, भालचंद्र सुराणा, अ. भा. आदिवासी सेनेचे अध्यक्ष दि. ना. उघाडे, आर. जी. परदेशी, अजित लुणावत, अशोक नावंदर, ताराचंद महाराज, घनश्याम रावत, नगरसेवक उमेश कस्तुरे, सत्तार मणियार, डॉ. सचिन सेठी, रवि चांदवडकर, शशिकांत भोंडवे यांच्या हस्ते दूध वाटप करण्यात आले. प्रास्ताविक आकाश खारके यांनी केले. सूत्रसंचालन हुकुमचंद पाटील यांनी केले. आभार सुनील आहेर यांनी मानले. यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, अजित पारख, प्रकाश नावंदर, प्रमोद पाठक, उमेश शिरोळे, महेश मुळीक, कृष्णा परदेशी, रामचंद्र नायर, सिंग, प्रसाद चौधरी, शांतिलाल चांडक आदींसह नागरिक उपस्थित होते.सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी व पथनाट्य सादर करीत सरत्या वर्षाला निरोप दिला, तर २०२० च्या उगवत्या सूर्यकिरणाच्या साक्षीने व्यसनमुक्तीचा संकल्प करत व्यसनाधीनतेची होळी पेटवून नववर्षाचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी शाळा परिसर स्वच्छ, सुंदर व व्यसनमुक्त ठेवण्याची शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून धूम्रपान निषेधाचे बोधचिन्ह तयार केले. मुख्याध्यापक एस.बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना धूम्रपानाचे आरोग्यावर होणारे घातक परिणाम सांगून त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव लोखंडे, सचिव प्रा. टी. एस. ढोली, विश्वस्त अरु ण गरगटे, सरपंच अरु णा रेवगडे, उपसरपंच भगीरथ रेवगडे, आशापूरचे सरपंच विष्णूपंत पाटोळे, अशोक रेवगडे, चंद्रभान रेवगडे, रामभाऊ रेवगडे उपक्र माचे कौतुक केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण