Eknath Shinde : चर्चेच्या माध्यमातून लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 14:38 IST2022-07-30T14:27:50+5:302022-07-30T14:38:16+5:30
Eknath Shinde : "पाचही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी त्यांच्या भागातील अडचणी मांडल्यात. काही प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर निर्णय घेऊन ते प्रश्न सोडवावेत."

Eknath Shinde : चर्चेच्या माध्यमातून लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मालेगाव (नाशिक) - चर्चेच्या माध्यमातून समाजातील लोकांच्या हिताचे प्रश्न सोडविण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला असून तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे काम शासकीय अधिकाऱ्यांनी करावे. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जनतेच्या मनात जागा निर्माण करण्याची संधी असून अशा उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शासन गौरव करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शनिवारी येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात आयोजत नाशिक महसूल विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
शिंदे म्हणाले की, पाचही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी त्यांच्या भागातील अडचणी मांडल्यात. काही प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर निर्णय घेऊन ते प्रश्न सोडवावेत. अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले असून त्यांचे शंभर टक्के पंचनामे झाले आहेत. दुबार पेरणीची आवश्यकता नाही. नैसर्गिक आपत्तीत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत देण्यात येईल.
जनावरांचा मृत्यू झाला असेल, घर आणि गोठ्यांचे नुकसान झाले असेल त्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्यात येईल. असे सांगुन शिंदे म्हणाले, वनहक्क पट्टे प्रकरणे युद्ध पातळीवर निकालात काढण्याची आवश्यकता आहे. ३६ लाख रकूल आणि पारंपारिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता कृषी विद्यापिठांना बळकटी दे्ण्याची गरज आहे.शेतकऱ्यांना सिविध देशातील आणि इतर राज्यांतील शेतकऱ्यांची शेती पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. क्लस्टर आणि सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे क्लस्टर शेतीला राज्य शासन प्राधान्य देईल असेही शिंदे म्हणाले.