नको काळाराम, आम्हाला हवा भोळाराम, सानप समर्थकांची फलकबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 16:37 IST2019-10-02T16:32:13+5:302019-10-02T16:37:03+5:30

नाशिक- भाजपाचे पूर्व नाशिकचे आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याच्या चर्चेंनतर नाशिकमध्ये त्यांचे समर्थक संतप्त झाले असून पंचवटीतील सानप यांच्या संपर्क कार्यालयासमोर त्यांनी प्रचंड संख्येने गर्दी केली आहे . नको आम्हाला काळाराम नको आम्हाला गोराराम सर्वांनाच पाहीजे तो भोळाराम अशाप्रकारचे फलक झळकावीत आहेत सानप यांच्या काही समर्थक नगरसेवकांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली आहे.

We do not want blackram, we want Bholaram, the backbone of supporters | नको काळाराम, आम्हाला हवा भोळाराम, सानप समर्थकांची फलकबाजी

नको काळाराम, आम्हाला हवा भोळाराम, सानप समर्थकांची फलकबाजी

ठळक मुद्देनाशिक पूर्व विभागात गोंधळ सानप यांच्यासाठी राजीनामयाची तयारी

नाशिक- भाजपाचे पूर्व नाशिकचे आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याच्या चर्चेंनतर नाशिकमध्ये त्यांचे समर्थक संतप्त झाले असून पंचवटीतील सानप यांच्या संपर्क कार्यालयासमोर त्यांनी प्रचंड संख्येने गर्दी केली आहे . नको आम्हाला काळाराम नको आम्हाला गोराराम सर्वांनाच पाहीजे तो भोळाराम अशाप्रकारचे फलक झळकावीत आहेत सानप यांच्या काही समर्थक नगरसेवकांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली आहे.

भाजपाने मंगळवारी (दि.१) पक्षाच्या १२५ उमेदवारांची यादी घोषित केली या यादीत नाशिकमधील भाजपाच्या चार पैकी तीन आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. मात्र माजी शहराध्यक्ष आमदार सानप यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. सानप यांच्या विरोधात पक्षातीलच एक गट असून त्या गटातील स्थायी समितीचे सभापती उध्दव निमसे हे स्पर्धेत आहेत. परंतु त्यापुढे जाऊन मनसे सोडून भाजपाचे तिकीट घेण्यासाठी उत्सूक असलेले अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी देखील जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सानप यांचे तिकीट कापण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी त्यासंदर्भात अधिकृत कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानावरील घडामोडीनुसार सानप यांना परत पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भाजपाचे आमदार सानप यांचे समर्थक कृष्ण नगर येथील त्यांच्या निवासस्थानासमोर जमले असून घोषणाबाजी सुरू आहे.

यात नको आम्हाला काळाराम, नको तो गोराराम, सर्वांनाच पाहिजे तो भोळाराम असे फलक लावून गोंधळ सुरू आहे. तर काही नगरसेवकांनी सानप यांच्यासाठी राजीनामयाची तयारी दर्शवली आहे. गेले पाच वर्षांत सानप यांच्या समर्थनाबरोबरच विरोधक देखील वाढले असून गटबाजीचा देखील त्यांच्यावर ठपका आहे. त्याचा फटका सानप यांना बसल्याचे सांगितले जात आहे. अर्थात, सानप यांना समर्थकांची घोषणाबाजी देखील महागात पडण्याची चिन्हे आहेत.

Web Title: We do not want blackram, we want Bholaram, the backbone of supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.