आम्ही ब्राह्मण आहोत याचा गर्व, पण स्वतःचं 'मार्केटिंग' करता येत नाहीः अमृता फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 13:32 IST2022-11-15T13:30:07+5:302022-11-15T13:32:32+5:30
अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

आम्ही ब्राह्मण आहोत याचा गर्व, पण स्वतःचं 'मार्केटिंग' करता येत नाहीः अमृता फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. “आम्ही ब्राह्मण आहोत, याचा आम्हाला गर्व आहे,” असं त्या म्हणाल्या. सोमवारी नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात फडणवीस बोलत होत्या.
“आम्ही ब्राह्मण आहोत. याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही बुद्धीजीवी आहोत याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत याचा आम्हाला गर्व आहे. आमच्यात कोणतीही कमतरता नाही. पण आम्हाला स्वत:चं मार्केटिंग करता येत नाही,” असं अमृता फडणवीस म्हणाल्या. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या.
अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघ आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम में सम्मलित हुई और कार्यक्रम को सम्बोधित किया। इस दौरान साथ में मा.अमृता फडणवीस जी,विधायक मा. सिमा हिरे जी, विधायक मा. देवयानी फरांदे जी के साथ अन्य मान्यवर उपस्थित थे। pic.twitter.com/0rCCkqeSg5
— Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatippawar) November 14, 2022
“ देवेंद्र फडणवीस न मागता मुख्यमंत्री झाले. त्यांनी हे पद कधीच मागितलं नाही. त्यांची कार्यपद्धत, लोकसेवा पाहून मोदींनी आणि वरिष्ठांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं,” असंही त्यांनी नमूद केलं.