आॅटोडीसीआरचा तिढा सुटण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:26 IST2018-12-29T23:22:14+5:302018-12-30T00:26:45+5:30

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विकासकांना अडचणीच्या ठरलेल्या आॅटोडिसीआरचा तिढा सोडविण्यासाठी संबंधित कंपनीला तंबी दिल्यानंतर आता अनेक प्रकरणाचा निपटारा वेगाने सुरू करण्यात आला

 On the way to the Aatondisir's three-stop ride | आॅटोडीसीआरचा तिढा सुटण्याच्या मार्गावर

आॅटोडीसीआरचा तिढा सुटण्याच्या मार्गावर

नाशिक : महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विकासकांना अडचणीच्या ठरलेल्या आॅटोडिसीआरचा तिढा सोडविण्यासाठी संबंधित कंपनीला तंबी दिल्यानंतर आता अनेक प्रकरणाचा निपटारा वेगाने सुरू करण्यात आला असून, नगररचना विभागाचे दोन अभियंतादेखील पुणे येथे दौरा करून परतले आहेत. त्यांचाही अहवाल आयुक्तांना सादर होणार आहे. त्यामुळे वर्षाखेरीस हा प्रश्न बऱ्यापैकी सुटण्याची शक्यता आहे.
दीड वर्षांपासून आॅटोडिसीआर या प्रकाराने बांधकाम व्यवसाय अडचणीत आणला आहे. नवीन प्रकरणे दाखल होत नाही आणि दाखल झालीच तर किरकोळ कारणावरून नाकारली जात असल्याने पुन्हा तपासणी शुल्क भरून प्रकरणे दाखल करावी लागत असल्याने अडचण निर्माण झाली होती. यापूर्वीच्या दोन आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रारी करूनदेखील त्यांनी आॅटोडिसीआरच श्रेष्ठ ठरवले होते. दरम्यान आयुक्त राधाकृष्ण गमे रुजू झाल्यानंतर विकासकांच्या तसेच वास्तुविशारदांच्या संघटनांनी आॅटोडिसीआरविषयी आयुक्तांकडे तक्रारी केल्या.
त्यामुळे त्यांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधी आणि महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी अनेक निर्णय घेतले असून, जुनी प्रकरणे ३१ डिसेंबरच्या आत निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कंपनीने निपटारा करतानाच यापूर्वी जनरेट न होणाºया पीडीएफ फाइलीदेखील कार्यान्वित केल्या आहेत.

Web Title:  On the way to the Aatondisir's three-stop ride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.