The water supply to the entire city was cut off on Saturday | संपूर्ण शहरात शनिवारी पाणीपुरवठा बंद

संपूर्ण शहरात शनिवारी पाणीपुरवठा बंद

ठळक मुद्देदुरूस्तीची कामे रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी

नाशिक : महापालिकेला आणि महावितरण कंपनीला पाणीपुरवठ्याची विविध कामे करायची असल्याने येत्या शनिवारी (दि.२८) मुकणे, गंगापूर तसेच चेहेडी बंधारा या सर्व ठिकाणांहून शहरात होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, तर रविवारी (दि.२९) सकाळी कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा हेाणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.

मनपाच्या मुकणे धरण रॉवॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ के.व्ही. वाहिनीवरून वीजपुरवठा घेतलेला आहे. या सबस्टेशनमधील कामांमुळे शनिवारी (दि.२८) सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र येथून विविध भागांना होणारा पाणीपुरवठा होणार आहे. मनपाचे गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथून मनपाचे बाराबंगला, पंचवटी, निलगिरीबाग, गांधीनगर, नाशिकरोड या जलशुद्धीकरण केंद्रास रॉ-वॉटर पुरवठा करणारी गुरुत्ववाहिनी मुक्त विद्यापीठाजवळ फुटली असून, या जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळेदेखील गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर गंगापूर धरण येथूनच नाशिकरोड या जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी गुरुत्ववाहिनीची गळती बंद करण्यात येणार आहे.

गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र आणि चेहेडी पंपिंग स्टेशन येथेही कामे करण्यात येणार असल्याने होणारा पाणीपुरवठादेखील बंद राहणार आहे.

Web Title: The water supply to the entire city was cut off on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.