देवगावला दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 16:20 IST2019-02-06T16:19:51+5:302019-02-06T16:20:50+5:30

देवगाव : गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणीपातळी कमी झाल्याने आणि हातपंपाने तळ गाठल्याने पाणीटंचाई जाणवत असून, ग्रामपंचायतीने नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा दिवसाआड केला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गोदावरी डावा कालव्याचे आवर्तन त्वरित देऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 Water supply to Devgoa | देवगावला दिवसाआड पाणीपुरवठा

देवगावला दिवसाआड पाणीपुरवठा

ठळक मुद्दे महिलांची भटकंती : गोदावरी डावा कालव्याचे आवर्तन देण्याची मागणी

देवगाव : गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणीपातळी कमी झाल्याने आणि हातपंपाने तळ गाठल्याने पाणीटंचाई जाणवत असून, ग्रामपंचायतीने नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा दिवसाआड केला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गोदावरी डावा कालव्याचे आवर्तन त्वरित देऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
देवगावला सन १९८१ पासुन ग्रामपंचायत अहल्यादेवी कालीन बारवातून नळाद्वारे पाणीपुरवठा करत आहे. परंतु ज्या विहीरीतुन पाणीपुरवठा केला जातो. त्या विहिरीचे पाणी पावसाळा संपताच गावा जवळुन जाणार्या गोदावरी डाव्या कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असते. कालव्याला पाणी नसेल तर पाणीपुरवठा योजना कोलमडते. दरवर्षी होणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने दोन विहिरी, गल्ली बोळात, खळयात- मळ्यात हातपंपही दिले आहेत. यापैकी दोनच हातपंप चालू आहेत, व तेही पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यात गोदावरी डाव्या कालव्यात पाणी असेल तर, आणि कालवा ओसरला की एक हंडाभर पाण्यासाठी महिलांची दमछाक होते.

Web Title:  Water supply to Devgoa