उद्या दुपारपासून शहरात पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:39 IST2020-05-29T00:37:59+5:302020-05-29T00:39:02+5:30

महापालिकेचे गंगापूर धरण येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे पावसाळापूर्व विद्युत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मुकणे धरण पंपिंग स्टेशन परिसरातील देखील कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवारी (दि. ३०) संपूर्ण शहरात दुपारी व सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही.

Water supply to the city will be cut off from noon tomorrow | उद्या दुपारपासून शहरात पाणीपुरवठा बंद

उद्या दुपारपासून शहरात पाणीपुरवठा बंद

नाशिक : महापालिकेचे गंगापूर धरण येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे पावसाळापूर्व विद्युत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मुकणे धरण पंपिंग स्टेशन परिसरातील देखील कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवारी (दि. ३०) संपूर्ण शहरात दुपारी व सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही.
रविवारी (दि. ३१) सकाळी कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे, असे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.

Web Title: Water supply to the city will be cut off from noon tomorrow