लासलगावसह सोळा गावांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:04 IST2020-08-07T22:33:11+5:302020-08-08T01:04:29+5:30
लासलगाव : परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेत बिघाड झाल्याने लासलगावसह सोळा गावांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली.

जॅकवेलचे दुरूस्तीचे काम करतांना अधिकारी व कर्मचारी.
लासलगाव : परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेत बिघाड झाल्याने लासलगावसह सोळा गावांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली.
लासलगावसह सोळा गावांना पाणी पुरवठा करणाºया पाणी योजनेतील जॅकलेलमधील मोटारी जळाल्यामुळे ते दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळे या योजने अंतर्गत येणाºया गावांना तीन दिवस पाणी पुरवठ्यापासून वंचित राहावे लागणार आहे. नांदुरमध्यमेश्वर येथे सोमवारी पहाटे ४ वाजेपासून वीजपुरवठा बंद होता. त्यात पुन्हा संध्याकाळी ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाला असून जॅकवेल येथे असलेला पंपदेखील जळाला. सदर पंपाच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे तीन दिवस गावात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.