शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यासह नऊ गावात पाणीटंचाई

By admin | Updated: February 25, 2016 23:19 IST

पाण्यासाठी भटकंती : गिरणा नदीपात्र कोरडे; उपाययोजना करण्याची मागणी

 देवळा : सामुदायिक पाणीपुरवठा योजनेची उद्भव विहीर गिरणा नदीवर अवलंबून असून, गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्याने विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे देवळ्यासह नऊ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.लोहोणेर येथील नऊ गाव पाणीपुरवठा योजनेची उद्भव विहीर व येथील नगरपंचायतीची जलशुद्धीकरण योजनेची विहीर यातील साठा पाहता देवळा शहरासह नऊ गावांना पाणीपुरवठा उपलब्ध होत नसल्याचे लक्षात आले. त्यावर उपाययोजना म्हणून आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहित करून त्यांना योग्य तो मोबदला देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. मात्र त्यांच्याही विहिरींनी तळ गाठला असल्याने शहराला डोण शिवारातील कालवण धरणावर अवलंबून राहावे लागणार आहे. पिण्यासाठी ७ एमसीएफटी पाणी आरक्षित करून घेतले. योगायोगाने पुनंद व चणकापूरमधून रामेश्वरबरोबरच डोण शिवारातील कालवण धरणात पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे शहरासह नऊ गावांचा पाणीप्रश्न गिरणा नदीचे पुढील आवर्तन येईपर्यंत तरी सुटणार आहे. मात्र त्यासाठी लागणारा वीजपुरवठा आठवड्यातून तीन दिवस आठ तासच मिळणार आहे. मात्र सदरच्या ठिकाणी २४ तास वीजपुरवठा व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसे झाले तरच पाणीप्रश्न सुटणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद, पुरवठा विभाग व वीज वितरण कंपनी यांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषद कृषी सभापती केदा अहेर, नगरसेवक लक्ष्मीकांत अहेर, प्रदीप अहेर, जितेंद्र अहेर, अतुल पवार, बाळासाहेब अहेर, किरण अहेर, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नंदन नवरे, उपअभियंता बोरसे, चव्हाण, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता घुमरे, तांत्रिक सल्लागार देवरे, कुरणे, कुंदन चव्हाण, संजय बांगर सहभागी झाले होते. (वार्ताहर)