पाणी उपसावर नियंत्रण आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:47 IST2018-08-11T00:47:16+5:302018-08-11T00:47:41+5:30
नाशिकरोड : शेतीसाठी व शहरात औद्योगिक क्षेत्राच्या वापरासाठी होणाऱ्या अनिर्बंध पाण्याच्या उपसावर नियंत्रण आणणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकानेच पाणी बचतीसाठी जनजागृती करावी, तसेच अमंलबजावणी करावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ च्या मसुदा नियमांचा बारकाईने अभ्यास करून संबंधितांनी आपले मत किंवा सूचना ३१ आॅगस्ट २०१८ पर्यंत नोंदविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी केले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परीषद अध्यक्ष शीतल सांगळे, उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले, दिलीप स्वामी, सुखदेव बनकर, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जलस्वराज्य टप्पा २ चे उपसंचालक चंद्रकांत भोयर, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल आदी उपस्थित होते.
सांगळे म्हणाल्या, भूजल संर्वधन करणे ही काळाची गरज आहे. सदरच्या अधिनियमाची अंमलबजावणी करताना सर्वसामान्य शेतकºयांचे हित लक्षात घेऊन त्यानुसार अधिनियमात आवश्यक ते बदल करावेत. अधिनियमाच्या मसुद्यातील नियमांमधील जिल्ह्यातील विहिरी, विंधन विहिरींची नोंदणी, पाण्याचे गुणवत्तेबाबत संरक्षण, भूजलाचे कृत्रिमरीत्या पुनर्भरण याबाबत बेडवाल यांनी माहिती दिली.
प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी अधिनियमाच्या मसुदा नियमात संबंधितांनी दि. ३१ आॅगस्टपर्यंत आपल्या सूचना किंवा हरकती अपर मुख्य सचिव, मुंबई यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असे आवाहन केले. या कार्यशाळेसाठी
जिल््ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, प्रमुख ग्रामस्थ, महत्त्वाचे शेतकरी उपस्थित होते.
उपाययोजना करावी
माने म्हणाले, शेतीसाठी व शहरात औद्योगिक क्षेत्राच्या वापरासाठी होणाºया अनिर्बंध पाण्याच्या उपशावर नियंत्रण आणणे अत्यावश्यक आहे. पाणी बचतीच्या दृष्टीने इमारतींवर पडणाºया पावसाच्या पाण्यापासून जल पुनर्भरण, औद्योगिकीकरण क्षेत्रातील प्रदूषित पाण्याचे शुद्धीकरण करणे यासारख्या उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असेही माने यांनी सांगितले.