जलशुद्धीकरण प्रकल्प रामेश्वर ग्रामपंचायतला हस्तांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:44 IST2018-12-24T00:44:29+5:302018-12-24T00:44:50+5:30
रामेश्वर, ता. देवळा येथे बुलढाणा अर्बन को-आॅप. बँक व ग्रामसमृद्धी फाउंडेशन पिंपळगाव बसवंत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतीला पाणी शुद्धीकरण प्रकल्प हस्तांतरित करण्यात आला.

जलशुद्धीकरण प्रकल्प रामेश्वर ग्रामपंचायतला हस्तांतरित
खर्डे : रामेश्वर, ता. देवळा येथे बुलढाणा अर्बन को-आॅप. बँक व ग्रामसमृद्धी फाउंडेशन पिंपळगाव बसवंत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतीला पाणी शुद्धीकरण प्रकल्प हस्तांतरित करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील नागरिकांना शुद्धपाणी मिळणार आहे. या प्रकल्पाचे उद््घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्राम समृद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील म्हणाले सर्व कंपन्या व बँक यांचा समाज विकास निधी वापरून गावांचा विकास करणे हा आमचा उद्देश आहे. या माध्यमातून आज रामेश्वर गावात पाणीशुद्धीकरण प्रकल्प राबविण्यात आला. असेच विविध प्रकल्प राबवून महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी ग्रामविकासाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी ग्रामसमृद्धी फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रकाश महाले, शिरसण्याचे सरपंच जोरे, माणिक पगार, उत्तम आप्पा पगार, अण्णा पगार, जिभाऊ पगार, बापू पगार, कारभारी पगार, रघु पगार, बाबूलाल बागुल, लक्ष्मण पगार, नितीन पगार, पांडुरंग पगार, संजय पगार, भिका पगार गणेश अहेर, तुळशीराम मेधने आदी उपस्थित होते. गोविंद पगार यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच विजय पगार यांनी आभार मानले.