शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

म्हसरूळ येथील पाणीप्रश्न पेटला

By admin | Updated: September 21, 2014 00:53 IST

म्हसरूळ येथील पाणीप्रश्न पेटला

पंचवटी : विभागातील प्रभाग क्रमांक १, ५ आणि ६ या तीनही प्रभागांस गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पाणीपुरवठा विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत मनसे आणि भाजपाच्या चौघा नगरसेवकांनी एकत्र येऊन प्रभातनगर जलकुंभाजवळ ठिय्या आंदोलन केले. विशेष म्हणजे, चार ते पाच दिवसांपूर्वीच मनसे नगरसेवक गणेश चव्हाण यांनी जलकुंभावर चढून आंदोलन छेडले होते. त्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून पाणीप्रश्न मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या होत्या; मात्र त्यानंतरही पाणीप्रश्न ‘जैसे थे’ राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या आंदोलनात पंचवटी प्रभागाच्या सभापती शालिनी पवार, सिंधू खोडे, रंजना भानसी व मनसे नगरसेवक गणेश चव्हाण आदि सहभागी आहेत. प्रभागात दोनवेळ पाणीपुरवठा करूनही पुरेसे पाणी येत नसल्याने एकवेळ पाणीपुरवठा करावा, असे सुचविण्यात आले होते. एकवेळचा पाणीपुरवठा करूनही पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिकांनी केल्याने संतप्त लोकप्रतिनिधींनी प्रभागातील नागरिकांसह जलकुंभाच्या खाली बसून ठिय्या आंदोलन केले. एकीकडे धरणातील जलसाठा वाढला असला, तरी नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने पाणीप्रश्न सोडविणार कोण, असा सवाल लोकप्रतिनिधींनी केला आहे. (वार्ताहर)