बंधा-यात आवर्तनाचे पाणी, नामपूरकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 03:52 PM2019-05-17T15:52:39+5:302019-05-17T15:53:31+5:30

शेवटचे आवर्तन : महिनाभराचा पाणीप्रश्न सुटला

 Water of Period, Relief for Namrupar | बंधा-यात आवर्तनाचे पाणी, नामपूरकरांना दिलासा

बंधा-यात आवर्तनाचे पाणी, नामपूरकरांना दिलासा

Next
ठळक मुद्देयामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर भरली असून नविन विहीरीतही पाणी उतरले आहे.

नामपूर : शहर भयावह पाणीटंचाईस तोंड देत असतांनांच नामपूरला दीड कोटी रु पये खर्चून तयार केलेल्या केटिवेअर योजनेचे काम पूर्ण झाले असून मोसमनदीचे या वर्षाचे शेवटचे आवर्तनाचे पाणी या केटिवेअरमध्ये आल्यामुळे नामपूरचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. दरम्यान, यामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर भरली असून नविन विहीरीतही पाणी उतरले आहे. त्यातच नदीकाठावरील इंधनविहीरीना पाणी उतरायला सुरु वात झाल्याने पावासाळा सुरु होईपर्यंत महिनाभरासाठी का होईना नामपूरकरांना दिलासा मिळणार आहे.
केटीवेअरला पाणी आल्यामुळे सधनलोक जमिनी घेऊन येथून पाणी इतरत्र नेण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मूळ हेतू बाजूला राहिल. त्यामुळे शुक्रवारी (दि.१७) श्रीराम मंदिरात ग्रामस्थांची सभा नामपूरचे सेवानिवृत्त अध्यापक शरद नेरकर यांचे अध्यक्षस्थानी घेण्यात आली. सभेत पाणी व वाळूतस्करी यावर चर्चा करण्यात आली. यात काही निर्णय घेण्यात आले. नदीकाठापासून १०० मीटर अंतरापर्यत नविन विहीर खोदू नये. आढळल्यास ग्रामपंचायतीने कारवाई करावी. मोठा बंधारा ते नकट्या बंधा-यापर्यंत वाळूउपशावर बंदी घालावी. शिवारातले पाणी शिवारातच ठेवावे. पाईपलाईन किंवा टॅँकरमधून शिवाराबाहेर पाणी नेऊ नये आदी, महत्वपूर्ण ठराव करण्यात आले. यावेळी केटिवेअरसाठी प्रयत्न करणारे डॉ. गिरासे यांचा गौरव करण्यात आला.

विविध सूचना
ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच दक्ष रहावे असे आवाहन नामपूरचे सामाजिक कार्यकर्ते दिपक सावंत व संभाजी सावंत यांनी केले . तर नदीची नांगरणी केल्यास पाणीपातळी वाढण्यास मदत होईल यावरही चर्चा झाली. चर्चेत बाजीराव सावंत, किरण अहिरे, दिपक सावंत ,संभाजी सावंत, प्रविण सावंत,अशोक सुर्यवंशी , कविता सावंत, राजेंद्र सावंत, प्रमोद सावंत, विनोद सावंत. अश्पाक पठाण आदींनी सहभाग नोंदविला.

Web Title:  Water of Period, Relief for Namrupar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.