१३ लाखांच्या महसुलावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:04 PM2018-07-12T23:04:56+5:302018-07-13T00:27:06+5:30

सटाणा : महसूल खाते एकीकडे गौणखनिज चोरी करणाºयांवर दंडात्मक कारवाई करीत असताना दुसरीकडे मात्र पकडलेली वाहने मंत्रालयातील एका फोनने सोडून देऊन एकप्रकारे गौणखनिज तस्करीलाच खतपाणी घातले जात असल्याचा प्रकार सटाणा तहसीलमध्ये उघडकीस आला आहे. वाळूच्या तीन टॅÑक्टरसह मुरूम भरलेले डंपर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता सोडून दिल्याने महसूल यंत्रणा संशयाच्या घेºयात सापडली आहे. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्या भूमिकेमुळे साडेतेरा लाखांचा महसूल बुडाल्याचे वर्तुळात बोलले जात आहे.

 Water over 13 lakhs of revenue | १३ लाखांच्या महसुलावर पाणी

१३ लाखांच्या महसुलावर पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देबागलाण : दंड न आकारताच सोडली गौणखनिजाची वाहने; यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात

सटाणा : महसूल खाते एकीकडे गौणखनिज चोरी करणाºयांवर दंडात्मक कारवाई करीत असताना दुसरीकडे मात्र पकडलेली वाहने मंत्रालयातील एका फोनने सोडून देऊन एकप्रकारे गौणखनिज तस्करीलाच खतपाणी घातले जात असल्याचा प्रकार सटाणा तहसीलमध्ये उघडकीस आला आहे. वाळूच्या तीन टॅÑक्टरसह मुरूम भरलेले डंपर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता सोडून दिल्याने महसूल यंत्रणा संशयाच्या घेºयात सापडली आहे. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्या भूमिकेमुळे साडेतेरा लाखांचा महसूल बुडाल्याचे वर्तुळात बोलले जात आहे.
गेल्या महिन्यात वाळू माफियांविरुद्ध महसूल व पोलीस यंत्रणेने धडक मोहीम हाती घेतली होती. मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे यांनी नामपूर व सटाणा शहरात रात्रीच्या सुमारास वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केले होते. या कारवाईबरोबरच तहसील कार्यालयातील काही अधिकाºयांनीदेखील पोलिसांच्या बरोबरीने कारवाई केली होती. या कारवाई दरम्यानच महसूलच्या अधिकाºयांनी मुरूम चोरी करणारा डंपर व जेसीबीविरु द्ध कारवाई केली होती. वाळू चोरीत पकडलेल्या टॅÑक्टरला प्रत्येकी एक लाख ३० हजार रु पयांच्या दंडात्मक कारवाईबाबत नोटीस बजावल्या तर डंपरला मुरूम चोरी प्रकरणी नऊ लाख २० हजार रु पये दंड भरण्यास बजावले होते.
तशा लेखी नोटिसादेखील तस्करांना बजावल्या होत्या; मात्र पंधरा दिवस तहसील आवारात पकडून ठेवलेली ही वाहने अचानक सोडून दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. गौणखनिज चोरी रोखण्यासाठी महसूलची यंत्रणा रात्रपहाट एक करून वाहने पकडत असताना दुसरीकडे मात्र हीच वाहने तहसीलदार , प्रांताधिकारी दंडात्मक कारवाई न करताच सोडून दिल्याने कनिष्ठ अधिकाºयांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या गौणखनिज चोरीमुळे महसूल यंत्रणेलाच आरोपीच्या पिंजºयात बसविले जाते.
अशा परिस्थितीत महसूल विभागातील कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी वाळू, मुरूम चोरी रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून वाहने पकडतात. गेल्या अनेक दिवसांपासून मुरूम चोरी करणारे डंपर, जेसीबीदेखील पकडले. संबंधित माफियांना दंडात्मक कारवाईसाठी नोटिसादेखील बजावण्यात आल्या. नोटीस बजावल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी काही पुढाºयांनी मांडवली करण्याचाही प्रयत्न केला; परंतु यश आले नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गौण खनिज चोरीसंदर्भात अधिकारी आणि वाळूचोर यांच्यात लागेबांधे असल्याचा पुनरुच्चार केला होता. त्यांनतर हे प्रकरण उघडकीस आल्याने चर्चांना ऊत आला आहे.
मंत्रालयातून फोन कुणाचा ?
पंधरा दिवसांनी अचानक तहसील आवारातून पकडलेली वाहने गायब झाली. या प्रकारामुळे काही वाळू माफियांनी अधिकाºयांना धारेवर धरताच एका वरिष्ठ अधिकाºयाने मंत्रालयातून फोन आल्यामुळे वाहने सोडल्याचा गौप्यस्फोट केला. याबाबत गुन्हा एक न्याय मात्र दोघांना अलग अलग. ज्या कंपनीचे डंपर पकडले त्या कंपनीत एक माजी मंत्री पार्टनर असल्याचा खुलासादेखील करण्यात आला; मात्र मंत्रालयातून कोणाचा फोन होता की कोणी डमी फोन केला याबाबत उलटसुलट चर्चा असून, मंत्रालयातून जनहिताची कामे अपेक्षित असताना या फोनमुळे आता खनिज तस्करीलाच खतपाणी घातले जात आहे. या फोनमुळे तब्बल साडेतेरा लाखांच्या महसुलावर पाणी सोडले आहे.

Web Title:  Water over 13 lakhs of revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा