सायखेडा : ‘ओढ ही विठुरायाच्या दर्शनाची, ओढ ही पंढरपूरनगराची’ या संतांच्या वचनाप्रमाणे जून महिन्यात महाराष्ट्रातील लाखो भाविकांना ओढ लागते ती पंढरपूरच्या वारीची. यंदा कोरोनाच्या संकटामुळे हजारो वर्षांची परंपरा असणाºया वारीच्या अखंडतेबद्दल शासनाच्या निर्णयाकडे वारकरी व भाविकांचे लक्ष लागले आहे.आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तीचा मेळा भरतो. राज्याच्या कानाकोपºयातून हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षानुवर्षे येत आहेत. या भाविकांमध्ये दिंडीच्या माध्यमातून पायी येणाºया वारकऱ्यांची संख्या लक्षणीय असते. वारीचे दिवस जवळ येऊ लागल्याने वारकºयांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिक जिल्ह्यातील अनेक दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. यंदा कोरोना रोगाने थैमान घातल्यामुळे वारी निघते की नाही आणि विठुरायाचे दर्शन होते की नाही अशी शंका निर्माण केली जात आहे. शासन यासंदर्भात काय निर्णय घेते, याकडे भक्तांचे लक्ष लागून आहे.महाराष्ट्र हे भक्तीचा मळा फुलवणारे राज्य आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया पंढरीच्या विठुरायाचा आषाढी आणि कार्तिकी वारी उत्सव साजरा होतो. शेकडो किलोमीटर पायी मजल-दरमजल करत हे वारकरी हरिनामाचा गजर करत पंढरपूरमध्ये पोहोचतात.जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक दिंड्यांचे प्रस्थान होत असते. यंदा कोरोनामुळे शासन परवानगी देते की नाही, याकडे महाराष्ट्रातील वारकºयांचे लक्ष लागूनआहे. शासनाने तत्काळ निर्णय घेऊन संभ्रम दूर करावा, अशी मागणी होत आहे.-----------------------------जून महिना जवळ येऊ लागला की लाखो वारकºयांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागतात. यंदा कोरोना रोगाने थैमान घातल्याने वारी होते की नाही, हा प्रश्न आहे. वारकºयांच्या परंपरेला ब्रेक लागतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.शासनाने तत्काळ निर्णय जाहीर करावा.- नितीन सातपुते, प्रदेश अध्यक्ष वारकरी सांप्रदाय-----------------------------वारकरी सांप्रदाय हजारो वर्षांपासून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करत आला आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा यंदा कोरोना रोगाच्या वाढत्या थैमानामुळे बंद होते की काय अशी चर्चा सुरू आहे. वारकरी हा दिंडी निघण्याअगोदर काही दिवस तयारीला लागतो. यंदा शंका निर्माण झाल्याने शासन दरबारी तत्काळ नियोजन करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.- साहेबराव डेर्लेवारकरी, शिंगवे
वारकऱ्यांना लागले पंढरपूर वारीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:11 IST