शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

नाशिक स्मार्ट करायचे की स्मार्ट घोटाळे करायचे?

By संजय पाठक | Updated: June 8, 2019 19:59 IST

नाशिक- स्मार्ट सिटी करण्याची केंद्र आणि राज्यशासनाची योजना चांगली आहे. परंतु त्यासाठी महापालिकेला समांतर यंत्रणा म्हणून जी स्मार्ट सिटी कंपनी स्थापन करण्याची कल्पना पुढे आली, ती वादग्रस्तच ठरणार होती आणि घडलेही तसेच मुंबई महापालिकेचा यापूर्वी एमएमआरडीएशी संघर्ष उदभवत असे, त्याच धर्तीवर हा संघर्ष उभा राहीला आहे. अर्थात, मुंबई महापालिकेचा तेथे अर्थाअर्थी संबंध नव्हता परंतु नाशिक मध्ये मात्र महापालिकेचा आर्थिक सहभाग आहे. त्यामुळेच दोन वर्षात खदखदणारा वाद चव्हाट्यावर आला आणि त्याची परिणीती कंपनीचे सीईओ यांच्या गच्छंतीने होणार आहे.

ठळक मुद्देशासनाच्या उद्देशाला हरताळसमांतर व्यवस्थेमुळे संघर्ष अपेक्षीतच होता

संजय पाठक, नाशिक-स्मार्ट सिटी करण्याची केंद्र आणि राज्यशासनाची योजना चांगली आहे. परंतु त्यासाठी महापालिकेला समांतर यंत्रणा म्हणून जी स्मार्ट सिटी कंपनी स्थापन करण्याची कल्पना पुढे आली, ती वादग्रस्तच ठरणार होती आणि घडलेही तसेच मुंबई महापालिकेचा यापूर्वी एमएमआरडीएशी संघर्ष उदभवत असे, त्याच धर्तीवर हा संघर्ष उभा राहीला आहे. अर्थात, मुंबई महापालिकेचा तेथे अर्थाअर्थी संबंध नव्हता परंतु नाशिक मध्ये मात्र महापालिकेचा आर्थिक सहभाग आहे. त्यामुळेच दोन वर्षात खदखदणारा वाद चव्हाट्यावर आला आणि त्याची परिणीती कंपनीचे सीईओ यांच्या गच्छंतीने होणार आहे.मुळात स्मार्ट सिटीची कल्पना पुढे आली तेव्हाच त्याविषयी मतभेद होते. त्यावेळी सत्तेवर असलेल्या मनसेने त्याला कडाडून विरोध केला होता. महापालिकेला समांतर व्यवस्था नको म्हणून त्यावेळी राज ठाकरे यांनी कंपनीकरणाला विरोध केला होता. त्यावेळी असलेले उपमहापौर गुरूमित बग्गा यांनी देखील कंपनीकरण करण्यास आणि त्या माध्यमातून लोकप्रतिनिधींचे अधिकार गहाण ठेवण्यास विरोध केला होता. परंतु त्यावेळी राज ठाकरे यांनी स्मार्ट सिटीस विरोध केल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले होते. त्यामुळे नंतर त्यांनी देखील होकार भरला. परंतु कंपनीकरणाचे दुष्परीणाम आता दिसु लागले आहे.र् महापालिके सारख्या संस्थेत कोणत्याही कामांच्या मंजुरीसाठी अनेक चाळण्यांमधून जावे लागते आणि मंजुरी घ्यावी लागते. विविध प्रकारच्या मान्यता, त्या रखडल्यास विलंब तर होतोच परंतु अनेक प्रकरणे टक्केवारीमुळे देखील अडकतात. ते दुर करण्यासाठी आणि कामे वेगाने होण्यासाठी कंपनीचा विषय पुढे आला. परंतु नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनीचे काम सीईओ प्रकाश थविल यांनी इतके वेगाने पुढे नेले की, कंपनीच्या मंजुरीशिवाय परस्पर निविदांमध्ये बदल केले असा आरोप होऊ लागला.

प्रशासकिय अधिकाऱ्यांनी अशाप्रकारचे काही बदल केले तर त्याचे दायित्व खुल्या पणाने स्विकारायला हवे आणि बदल का केले त्याचे उत्तर दिले की शंकेला वाव राहात नाही. कंपनीच्या कारभारात सीईओंनी नेमकी हीच चुक केली. मुळातच त्यांच्या बोलण्याच्या स्वराविषयी नगरसेवकांचा आक्षेप त्यात त्यांनी मागितलेली माहिती देण्यापेक्षा ती दडविण्यावर भर दिल्याने गेल्या दोन वर्षांपासुन सुरू असलेले संचालकांचा वाद बाहेर पडला आणि त्यांनी सीईओ हटाव या मागणीसाठी बहिेष्काराचे ब्रह्मास्त्र वापरले. त्यामुळे कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी सीईओंना हटविण्याची मागणी जवळपास मान्य केली.

केंद्रात राज्यात आणि महापालिकेत तिन्ही ठिकाणी भाजपा सेनेची सत्ता आहे. परंतु कंपनीवर सत्ता मात्र प्रशासकिय अधिकारीच गाजवत आहेत. दोन वर्षे आयुक्त अभिषेक कृष्ण आणि त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी हा वाद जास्त बाहेर पडू दिला नाही. मात्र मुंढे यांचे देखील थविल यांच्याशी जमले नाही. आयुक्त बदलले आणि आता थविलही जाणार आहेत. परंतु कंपनीचा कारभार हा संचालकांना रूचेल काय, हा खरा प्रश्न आहे. कंपनीचे कामकाज सुरू न झाल्यास हजारेक कोटींच्या कामांचे काय ती वेळात आणि दर्जेदार तसेच पारदर्शकतेने पुर्ण होण्याविषटी शंका आहे. संचालकांनी आत्ता जी भूमिका घेतली आहे , तशीच आक्रमक भुमिका त्यांनी कामे वेळेत पुर्ण करण्यासाठी करायला हवी अन्यथा ते देखील संशयाच्या घेºयात येण्यास वेळ लागणार नाही.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी