Wanjari community march: 'Must get increased reservation ...' | वंजारी समाजाचा मोर्चा : 'वाढीव आरक्षण मिळालेच पाहिजे...'
वंजारी समाजाचा मोर्चा : 'वाढीव आरक्षण मिळालेच पाहिजे...'

ठळक मुद्दे'आम्ही वंजारी'अशी ओळख सांगणारी डोक्यावर गांधी टोपी वंजारी समाजबांधव वाढीव आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर

नाशिक : आरक्षण आमच्या हक्काचं..., वाढीव आरक्षण मिळालेच पाहिजे...,एक वंजारी, लाख वंजारी...अशा घोषणा देत हजारो वंजारी समाजबांधव हातात भगवे ध्वज अन् डोक्यावर 'आम्ही वंजारी'अशी ओळख सांगणारी गांधी टोपी घालून वाढीव आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी (दि.११) रस्त्यावर उतरले.
क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक आरक्षण कृती समिती, वंजारी समाज या संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय मोर्चा बुधवारी शहरातून काढण्यात आला. राज्यात वंजारी समाजाचा समावेश एनटी-ड या वर्गवारीत करण्यात आला. ११ टक्क्यांपैकी समाजाला केवळ २ टक्के आरक्षण दिले गेले. समाजाची लोकसंख्या बघता हे आरक्षण अत्यंत तोकडे असल्याचे सांगत वाढीव आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील वंजारी समाज एकवटला. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने एकत्र येऊन शहरातील गंगापूररोडवरील नाईक महाविद्यालयातून मोर्चा काढण्यात आला. प्रत्येकाने हातात भगवा ध्वज,वाढीव आरक्षणाच्या मागणीचे फलक घेत मोर्चात सहभाग नोंदविला. पावसाच्या हलक्या सरींच्या वर्षावात भिजत हजारोंच्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या अग्रभागी टाळकरी ज्येष्ठ नागरिकांचा चमू संचलन करत होता. त्यापाठीमागे महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला, तरूण कार्यकर्ते या क्रमाने मोर्चेकऱ्यांनी गंगापूररोड, कॅ नडा कॉर्नर, शरणपूररोडवरून टिळकवाडी, पंडीत कॉलनीमार्गे पुन्हा जुन्या गंगापूर नाक्यावरून नाईक महाविद्यालयापर्यंत मार्गक्रमण क रत परिसरत दणाणून सोडला. दरम्यान, शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेऊन त्यांना वंजारी समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
---इन्फो--
अशा आहेत मागण्या
वंजारी समाजास (एनटी-ड प्रवर्ग) ७ टक्के वाढवून एनटीसाठी सरसकट आरक्षण द्यावे.
राज्यातील वंजारी समाजाची जनगणना करून ती तातडीने जाहीर करावी
समाजातील मुलामुलींसाठी जिल्हानिहाय वसतीगृहांची उभारणी करावी
नॉनक्रिम्रिलेयर प्रमाणपत्राची अट रद्द करावी
सारथी, बार्टीच्या धर्तीवर एनटीडी योजना राबवावी
उद्योग, व्यवसायांसाठी विना व्याज क र्ज उपलब्ध करून द्यावे
परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची तरतूद करावी
राज्यस्तरावर नाईक महामंडळाची स्थापना करावी
हभप वामन भाऊ सोनवणे यांना राष्टÑसंताचा दर्जा द्यावा.
--

 


Web Title: Wanjari community march: 'Must get increased reservation ...'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.