धनकवाडीच्या महिलांची भटकंती थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:13 IST2021-09-25T04:13:50+5:302021-09-25T04:13:50+5:30

ठक्कर बाप्पा योजनेतून पाइपलाइन येवला/जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील गुजरखेडे-धनकवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या ठक्कर बाप्पा योजनेतील निधीतून गुजरखेडे ते धनकवाडी ...

The wandering of women of Dhankawadi will stop | धनकवाडीच्या महिलांची भटकंती थांबणार

धनकवाडीच्या महिलांची भटकंती थांबणार

ठक्कर बाप्पा योजनेतून पाइपलाइन

येवला/जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील गुजरखेडे-धनकवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या ठक्कर बाप्पा योजनेतील निधीतून गुजरखेडे ते धनकवाडी पिण्याच्या पाण्यासाठी पाइपलाइनचे उदघाटन सरपंच बापूसाहेब चव्हाण यांच्या हस्ते करून कामाला सुरुवात झाल्याने येथील महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे. ग्रुप ग्रामपंचायत गुजरखेडे अंतर्गत गुजरखेडे ते धनकवाडी ३८ गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाइपलाइन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत या कामासाठी निधी उपलब्ध करण्यात आला असून, धनकवाडी येथे बऱ्याच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. येथील महिलांना आसपासच्या विहिरीवर किंवा हातपंपावर पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती, तर उन्हाळ्यात शासनाच्या टँकरवर अवलंबून रहावे लागत होते, पण ३८ गाव योजनेतून हा प्रश्न मार्गी लागणार असून, येथील महिलांची अनेक दिवसांपासून पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना आहे. याप्रसंगी सरपंच बापूसाहेब चव्हाण, माजी सरपंच रावसाहेब चव्हाण, नानासाहेब चव्हाण, ग्रामसेवक सतीश सोनवणे, केशव जाधव, सोमनाथ जाधव, पाराजी चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, अमोल पवार, भास्कर चव्हाण, काकासाहेब जाधव, पिराजी जाधव, महेश कदम आदी उपस्थित होते.

--------------------

येवला तालुक्यातील गुजरखेडे ते धनकवाडी येथील पाइपलाइन कामाच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच बापूसाहेब चव्हाण, रावसाहेब चव्हाण, ग्रामसेवक सतीश सोनवणे व ग्रामस्थ. (२४ धनकवाडी)

240921\24nsk_19_24092021_13.jpg

२४ धनकवाडी

Web Title: The wandering of women of Dhankawadi will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.