नद्यांना भींत म्हणजे पैेसे खाण्याचा नवा मार्ग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 15:19 IST2021-07-28T15:17:44+5:302021-07-28T15:19:51+5:30

नाशिक- राज्यात ज्या भागात पुरग्रस्त स्थिती निर्माण झाली तेथे उपाययोजना म्हणून नद्यांलगत भींत बांधण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. नद्यांभोवती संरक्षक भींत बांधणे गंमत आहे का असा प्रश्नही त्यांनी केला.

Walling rivers is a new way to eat money! | नद्यांना भींत म्हणजे पैेसे खाण्याचा नवा मार्ग!

नद्यांना भींत म्हणजे पैेसे खाण्याचा नवा मार्ग!

ठळक मुद्देमनसेने उडवली खिल्लीशिवसेनेची आधी जाहीरात, मग मदत!

नाशिक- राज्यात ज्या भागात पुरग्रस्त स्थिती निर्माण झाली तेथे उपाययोजना म्हणून नद्यांलगत भींत बांधण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. नद्यांभोवती संरक्षक भींत बांधणे गंमत आहे का असा प्रश्नही त्यांनी केला.

मिशन नाशिक महापालिकेसाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे बुधवारी (दि.२८) नाशिकच्या दौऱ्यावर आले असून त्यावेळी पत्रकारांशी बोलताना देशपांडे यांनी राज्य सरकाच्या भींत प्रकरणाची खिल्ली उडवली. समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारून त्यावर पुतळा उभारण्यात येेणार होता. तो पुतळा देखील उभारू शकले नाहीत आणि भींत काय उभारणार असा प्रश्न देशपांडे यांनी केला. राज ठाकरे यांनी अगेादरच गड किल्ले संवर्धनाचे महत्व सांगितले होते, असेही ते म्हणाले.

काेकणातील पुराच्या विषयावर बेालताना देशपांडे हे प्रशासनाचे फेल्युअर आहे, कोणत्याही प्रकारचे धोक्याचे इशारे लोकांना दिले नाही, निक्रीय लोकांच्या हाती सत्ता असल्याने नियोजन नाही की, मदत करण्याची एसओपी तयार नव्हती. तसेच आता मदत घोेषीत केली तरी पॅकेज जाहीर करून उपयोग नाही, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे असेही ते म्हणाले.

शिवसेनेने पुरग्रस्तांना मदत केली त्यावर बेालताना आधी जाहीरात केली मग मदत केली असा टेाला लगावून मनसे शंभर ते सव्वाशे ट्रक मदत करत असल्याचेही संदीप देशपांडे यांनी सांगितले.

Web Title: Walling rivers is a new way to eat money!