शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

विद्यार्थिनींशी चाळे; शिक्षकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 1:26 AM

इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथील पाच अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षकावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देकुरुंगवाडीतील घटना : जिल्हा परिषदेकडून गंभीर दखल

घोटी : इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथील पाच अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षकावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.संबंधित मुलींबाबत सदर प्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यात आला होता. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार इगतपुरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेकडे माहिती पाठविली होती. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी इगतपुरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे यांना गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश दिला.घोटी पोलिसांनी भादंवि कलम ३५४ (१), ५०४ आणि ५०६ तसेच लहान बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण २०१२ चे कलम ८.१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटीचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, शीतल गायकवाड याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.मुलींना धमकावल्याचेही उघडइगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत रोहिदास मदन चव्हाण (रा. साईसृष्टी अपार्टमेंट, जाधव संकुलजवळ, पळसे, ता. जि. नाशिक) हा प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ह्या शाळेतील १३ ते १४ वर्ष वयाच्या पाच अल्पवयीन विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यापूर्वी रोहिदास चव्हाण वर्गात आल्यावर खिडक्यांचे पडदे व दरवाजा लावून घेत असे. मुलींच्या बाकांवर बसून त्यांच्याशी अश्लील चाळे करीत असे. सदर मुलींनी कोणाला काही सांगू नये यासाठी त्याने धमकावल्याचेही प्रकरण उघडकीस आले होते.

टॅग्स :PoliceपोलिसMolestationविनयभंग