विद्यार्थिनींशी चाळे; शिक्षकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 01:27 IST2019-11-09T01:26:32+5:302019-11-09T01:27:38+5:30

इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथील पाच अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षकावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Walk with students; Crime on the Teacher | विद्यार्थिनींशी चाळे; शिक्षकावर गुन्हा

विद्यार्थिनींशी चाळे; शिक्षकावर गुन्हा

ठळक मुद्देकुरुंगवाडीतील घटना : जिल्हा परिषदेकडून गंभीर दखल

घोटी : इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथील पाच अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षकावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संबंधित मुलींबाबत सदर प्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यात आला होता. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार इगतपुरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेकडे माहिती पाठविली होती. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी इगतपुरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे यांना गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश दिला.
घोटी पोलिसांनी भादंवि कलम ३५४ (१), ५०४ आणि ५०६ तसेच लहान बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण २०१२ चे कलम ८.१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटीचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, शीतल गायकवाड याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
मुलींना धमकावल्याचेही उघड
इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत रोहिदास मदन चव्हाण (रा. साईसृष्टी अपार्टमेंट, जाधव संकुलजवळ, पळसे, ता. जि. नाशिक) हा प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ह्या शाळेतील १३ ते १४ वर्ष वयाच्या पाच अल्पवयीन विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यापूर्वी रोहिदास चव्हाण वर्गात आल्यावर खिडक्यांचे पडदे व दरवाजा लावून घेत असे. मुलींच्या बाकांवर बसून त्यांच्याशी अश्लील चाळे करीत असे. सदर मुलींनी कोणाला काही सांगू नये यासाठी त्याने धमकावल्याचेही प्रकरण उघडकीस आले होते.

Web Title: Walk with students; Crime on the Teacher