अंदरसुल परिसरात रिमझिम पाऊस मुसळधार पावसाची सर्वांना प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 19:26 IST2019-08-08T19:25:36+5:302019-08-08T19:26:22+5:30
अंदरसुल : अंदरसुल व पूर्व भागात सलग पाच दिवसापासून रिमझिम पाऊसाची संततधार चालू आहे. त्यामुळे चोरदार पावसाची परिसरातील शषतकरी पअतिक्षा करीत आहेत.

अंदरसुल गावात रिमझिम पावसामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ठीकठिकाणी खड्डे पडल्याने पाणी साचले जात आहे.
अंदरसुल : अंदरसुल व पूर्व भागात सलग पाच दिवसापासून रिमझिम पाऊसाची संततधार चालू आहे. त्यामुळे चोरदार पावसाची परिसरातील शषतकरी पअतिक्षा करीत आहेत.
गेली पाच दिवसापासून अंदरसुलकरांना सूर्यनारायणाचे दर्शन नाही. दिवसभर रिमझिम पाऊस पडत आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. मात्र अद्याप कोणतेही गावात जोराचा व मुसळधार पाऊस नाही.
अंदरसुल व परिसरात बळीराजाच्या जनावरांना किमान चारा होईल व दोन पैसे पदरात पडतील. या आशेने या वर्षी मका लागवड विक्र मी केली त्यावर काही मका लष्करी अळी मुळे हातची जाईल या भीतीने काहींनी नांगरून टाकली तर काहींनी हजारो रु पयांची औषध फवारणी केली आहे. आज मितीस असलेले पिके शाबूत आहेत. अजूनही विहिरी कोरड्या आहेत. कारण कोणत्याही नदीला व ओढ्याला पावसाचे पुरपाणी आलेले नाही. पालखेड डावा कालव्यात पुरपाणी सोडले. सर्व बंधारे भरण्याची प्रतीक्षा केली जात आहे. अंदरसुल गावात रिमझिम पावसामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ठीकठिकाणी खड्डे पडल्याने पाणी साचले जात आहे.