नुतन इमारतींची प्रतीक्षा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:38 IST2020-08-20T21:39:36+5:302020-08-21T00:38:07+5:30

वडाळागावातील महापालिकेच्या शाळेच्या नूतन इमारतीसाठी सुमारे दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे त्यामुळे येत्या एक वर्षात नूतन इमारत उभारून गावातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.

The wait for new buildings is over | नुतन इमारतींची प्रतीक्षा संपली

नुतन इमारतींची प्रतीक्षा संपली

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची सोय : मराठी, उर्दू शाळेचे वर्ग वाढणार

इंदिरानगर : वडाळागावातील महापालिकेच्या शाळेच्या नूतन इमारतीसाठी सुमारे दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे त्यामुळे येत्या एक वर्षात नूतन इमारत उभारून गावातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
वडाळागाव शेतकरी व हातावर काम करणाऱ्या नागरिकांची वस्ती आहे त्यामुळे शिक्षणासाठी महापालिकेच्या शाळेकडे पालक वर्गाचा कल आहे परंतु गावातील मराठी शाळा आठवीपर्यंत तर उर्दू शाळा दहावीपर्यंत आहे. यामध्ये उर्दू शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. मराठी शाळा नववी, दहावीच्या वर्ग नसल्याने विद्यार्थी वर्गांची गैरसोय होत आहे. महापालिकेच्या मराठी शाळेत आठवी पुढील शिक्षणासाठी गावातील शेकडो विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत किंवा शहरात ये जा करावी लागते त्यामुळे पालकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तसेच गावात एकच खाजगी शाळा असून त्यांच्याच विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जात असल्याने मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी अडचण होत असे. गावातील उर्दू शाळेमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत वर्ग आहे विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे एका बेंचवर तीन विद्यार्थी आणि काही खाली बसतात. याची दखल घेत नगरसेवक डॉ दीपाली कुलकर्णी यांनी मराठी व उर्दू शाळेची इमारतीसाठी प्रस्ताव महापालिकेला दिला होता तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.आता इमारतीच्या बांधकामास येत्या दहा दिवसात सुरू होणार आहे.

Web Title: The wait for new buildings is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.