वृषाली तायडे ठरली मिसेस इंडिया एम्प्रेस आॅफ द नेशनची उपविजेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 14:42 IST2018-09-18T14:42:23+5:302018-09-18T14:42:30+5:30
स्पर्धेसाठी चेन्नई, बॅँगलोर, गोवा, नागपूर अशा संपुर्ण भारतभरातुन स्पर्धक सहभागी झाले

वृषाली तायडे ठरली मिसेस इंडिया एम्प्रेस आॅफ द नेशनची उपविजेती
नाशिक- येथील वृषाली तायडे या पुणे येथे पार पडलेल्या मिसेस इंडिया एम्प्रेस आॅफ द नेशन-२०१८च्या उपविजेत्या ठरल्या आहेत. या स्पर्धेसाठी चेन्नई, बॅँगलोर, गोवा, नागपूर अशा संपुर्ण भारतभरातुन स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत मीरत येथील गौरांगी शेरावत प्रथम, वैशाली तायडे प्रथम उपविजेती तर ओमन येथील पिया पवानी द्वितीय उपविजेती ठरली. या सौंदर्य स्पर्धेची महाअंतिम फेरी पुणे येथे शानदार सोहळयाने पार पडली. महाअंतिम फेरीसाठी परिक्षक म्हणून युक्ता मुखी, शिबानी कश्यप, सोनल चौहान, शरहान सिंग यांनी काम पाहिले व त्यांना विनय अºहाना, सपनर छाजेड, डॉ. अक्षया जैन व कार्ल मस्कारेन्हास यांचीही साथ लाभली. डिवा सौंदर्य स्पर्धेतील चैतन्यशील जोडी असलेल्या अंजना व कार्ल मस्कारेन्हास यांच्या कल्पनेतुन साकारलेल्या या उपक्रमात सिल्वर (वय २० ते ३४), गोल्ड (३५ व पुढे) अशा दोन श्रेणींमध्ये उपांत्य फेरी गाठलेल्या १२ स्पर्धकांमधुन ६ सर्वोत्तम विजेते निवडण्यात आले. या स्पर्धकांनी आत्मविश्वास, सौंदर्य, शैली व बुद्धिमत्तेचे प्रदर्शन घडवत विजेतेपदाचा मुकुट पटकावला.