बायपास झालेल्या आजी व डायलिसीसवरील आजोबांकडूनही मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:37 AM2019-10-22T00:37:45+5:302019-10-22T00:38:54+5:30

Maharashtra Assembly Election 2019अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बायपास झालेल्या आजी लीलाबाई लोया यांची मतदान करण्याची जिद्द आणि मूत्रपिंड विकारामुळे डायलिसीसवर असतानाही व्हीलचेअरवर मतदानासाठी आलेले ज्येष्ठ वास्तुविशारद प्रकाश पाटील यांनी नाशिक शहरातील मराठा हायस्कूलमध्ये मतदानाचा पवित्र हक्क बजावला.

 Voting also on grandparents who were bypassed and grandparents on dialysis | बायपास झालेल्या आजी व डायलिसीसवरील आजोबांकडूनही मतदान

बायपास झालेल्या आजी व डायलिसीसवरील आजोबांकडूनही मतदान

Next

नाशिक : अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बायपास झालेल्या आजी लीलाबाई लोया यांची मतदान करण्याची जिद्द आणि मूत्रपिंड विकारामुळे डायलिसीसवर असतानाही व्हीलचेअरवर मतदानासाठी आलेले ज्येष्ठ वास्तुविशारद प्रकाश पाटील यांनी नाशिक शहरातील मराठा हायस्कूलमध्ये मतदानाचा पवित्र हक्क बजावला.
मतदान करणे हे अत्यंत महत्त्वाचे राष्टय कर्तव्य असून, देशाच्या तसेच राज्याच्या भवितव्यासाठी ते आवश्यक असते. परंतु हे माहिती असून मतदानासाठी टाळाटाळ करणाऱ्या किंवा मतदानाच्या दिवशीची सुटीची चंगळ उपभोगणाऱ्यांना मतदान करा, असे सांगावे लागते. तरीही अनेक मतदार ऐकत नाही म्हणून सवलतींचे आमिष दाखविले जाते. परंतु राष्टय कर्तव्याची खरी जाण असणारे मात्र प्रतिकूल परिस्थितीचा विचार न करताच स्वत:ची जबाबदारी कशी पार पाडतात. त्याची जाणीव
या दोघांबरोबरच अनेक ज्येष्ठ आणि
डॉक्टरांची मनाई असूनही स्वत: गेले मतदानाला
होलाराम कॉलनी येथे राहणारे प्रकाश पवार यांची कथा तर त्यापेक्षा गंभीर आहे. त्यांना काही महिन्यांपूर्वी मूत्रपिंड विकार झाल्याने डायलिसीस करण्यास सांगण्यात आले आहे. आठ दिवसांपासून डायलिसीस सुरू असून त्यांनादेखील डॉक्टरांनी बाहेर पडण्यास मनाई केली होती. मात्र त्यानंतरदेखील ते स्वत: मतदानासाठी आले होते. मतदानाचा पवित्र हक्क बजावूनच ते परत गेले.
नाशिक पूर्व मतदारसंघात पंचवटी भागातदेखील संतोष जाधव यांचा अपघात झाला असताना नांदूर येथील शाळा येथे मतदानासाठी आले होते. पंचवटीतच मखमलाबाद येथे विनायक तिडके हा युवकदेखील जखमी झाले असताना मतदानासाठी आला होता. या युवकाने मतदानाचे आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
दिव्यांगांमुळे संबंधित उदासीन मतदारांच्या डोळ्यात अंजन टाकणारी ठरावी.
गंगापूररोडवरील लीलाबाई लोया यांचे वय ८१ आहे. त्यांची पंधरा दिवसांपूर्वीच गंगापूररोडवरील एका रुग्णालयात बायपास झाली आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना बाहेर पडण्यास मनाई होती, मात्र तरीही त्या जिद्दीने व्हीलचेअरवर आल्या होत्या. मतदान करण्यासाठी त्यांचे पतीचे वय ८६ असून तेच या आजीबार्इंना घेऊन आले होते.

Web Title:  Voting also on grandparents who were bypassed and grandparents on dialysis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.