मतदारराजा आज देणार महाकौल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 01:46 AM2019-10-21T01:46:37+5:302019-10-21T01:49:57+5:30

विधानसभेच्या १५ मतदारसंघांसाठी जिल्ह्यात सोमवारी (दि. २१) मतदान होत आहे. या निवडणुकीत १४८ उमेदवार नशीब आजमावत असून, अनेक ठिकाणच्या लढतींकडे जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष असणार आहे. रविवारी सकाळपासून मतदान कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आल्यानंतर दुपारी कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले. सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून, सायंकाळी ६ वाजता मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल.

Voters Raja will give Mahakaul today! | मतदारराजा आज देणार महाकौल!

मतदारराजा आज देणार महाकौल!

Next
ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघात १४८ उमेदवार४५ लाखांपेक्षा अधिक मतदार बजाविणार हक्क३० हजारांपेक्षा अधिक मतदान कर्मचारी सज्ज

 नाशिक । विधानसभेच्या १५ मतदारसंघांसाठी जिल्ह्यात सोमवारी (दि. २१) मतदान होत आहे. या निवडणुकीत १४८ उमेदवार नशीब आजमावत असून, अनेक ठिकाणच्या लढतींकडे जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष असणार आहे. रविवारी सकाळपासून मतदान कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आल्यानंतर दुपारी कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले. सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून, सायंकाळी ६ वाजता मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. जिल्ह्यातील सुमारे ४५ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा निवडणूक शाखा, भरारी पथके तसेच शहर आणि ग्रामीण पोलीस यंत्रणेकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
कडेकोट बंदोबस्त
३,२१३ स्थानिक पोलीस, ७०० होमगार्ड्स, केंद्रीय सशस्र दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राज्य राखीव दलाचे ६०० जवान, गुजरात राज्य राखीव दलाचे २०० जवान मतदान निर्भयपणे पार पाडण्यासाठी बंदोबस्तावर आहेत.
जीपीएस यंत्रणा असलेल्या
कंटेनरने ईव्हीएम पोहोचविणार
मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर आणल्या जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका कंटेनरमध्ये भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत प्रत्येक मतदारसंघामधील स्ट्राँग रूममध्ये पोहोचविल्या जातील.
4,579
मतदान केंद्रे
जिल्ह्यातील
१५ विधानसभा मतदारसंघांसाठी ४,५७९ मतदान केंद्रे असून, १३३ तात्पुरती केंद्रे उभारण्यात
आली आहेत.
मतदानासाठी ‘सुटी’
मतदानाच्या दिवशी सर्व आस्थापना सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेली दुकाने, आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या पगाराची कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
ईव्हीएम बिघडल्यास काय आहे व्यवस्था?
ईव्हीएम मशीन बिघडण्याची शक्यता लक्षात घेता आधीपासूनच अतिरिक्त १० टक्के मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सेक्टर आॅफिसरच्या गाडीमध्ये ही यंत्रे सुरक्षित राहतील. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ यंत्र पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मतदारांसाठी ६,५३३ व्हीव्हीपॅट
विधानसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी सहा हजार ५३३ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदामध्ये मतदाराला पावती बघावयास मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.
कुठे काही गडबड झाली तर काय?
मतदानाच्या दरम्यान शहरातील कोणत्याही भागात कुठलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न झाला तर अवघ्या ५ ते ७ मिनिटांत जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी), दंगा नियंत्रण पथक (आरसीपी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी केंद्रीय सशस्र पोलीस, सीआयएसएफ, एसआरपीएफची कंपनी तत्काळ धाव घेईल. सोमवारी सकाळपासून मतदान संपेपर्यंत पोलीस आयुक्तांपासून पोलीस शिपाईपर्यंत सगळेच बंदोबस्तावर राहणार आहेत.

Web Title: Voters Raja will give Mahakaul today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.