नाशिक : फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक होणार असून, येत्या ७ सप्टेंबरपासून प्रारूप प्रभाग रचनेला सुरुवात केली जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपामार्फत दि. १५ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत मतदार जागृती मोहीम राबविली जाणार आहे. मतदार जागृती मोहिमेंतर्गत नवमतदारांनाही आवाहन केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या यादीत ज्यांची नावे समाविष्ट नसतील त्यांना या कालावधीत आपली नावे समाविष्ट करता येणार आहे. तसेच १ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांनाही नोंदणी करता येणार आहे. सोशल मीडियासह येत्या गणेशोत्सवात मनपामार्फत मतदार जागृती केली जाणार असून, गॅस सिलिंडरवर स्टिकर, घंटागाड्यांवर बॅनर लावूनही मतदारांपर्यंत जाऊन पोहोचले जाणार आहे. (प्रतिनिधी)
मनपामार्फत सप्टेंबरमध्ये मतदार जागृती मोहीम
By admin | Updated: August 24, 2016 01:02 IST
मनपामार्फत सप्टेंबरमध्ये मतदार जागृती मोहीम
मनपामार्फत सप्टेंबरमध्ये मतदार जागृती मोहीम
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}