शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

प्रती पंढरपूरला विठूनामाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 5:53 PM

कळवणला भाविकांची लोटली गर्दी : पालखी सोहळ्याचा उत्साह

ठळक मुद्देदर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्याने मंदिर परिसरात पोलीस व सुरक्षारक्षक नेमण्याची वेळ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांवर आली.

कळवण : गांधी चौक(पंचवटी)येथील प्रती पंढरपूर म्हणून गणल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात शुक्रवारी (दि.१२) आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी उसळली होती. बाल गोपाळांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत काढलेल्या पायी पालखी व दिंडीने कळवणकरांचे लक्ष वेधून घेतले.श्री विठोबा महाराज मंदिरात पहाटे ५ वाजता साकोरे येथील पोलीस पाटील वसंत आहेर, खालप सोसायटीचे चेअरमन शांतीलाल सूर्यवंशी व खमताने येथील निंबा पवार परिवाराने सपत्नीक महापूजा केली. विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्याने मंदिर परिसरात पोलीस व सुरक्षारक्षक नेमण्याची वेळ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांवर आली. दर्शनासाठी येणा-या प्रत्येक विठ्ठल भक्ताला महाप्रसादाचे मानकरी लक्ष्मण पगार, गिरीश पगार, नंदकुमार पगार, योगेश पगार यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.आषाढी एकादशी निमित्ताने मंदिर परिसर सजविण्यात येवून मंडप उभारला होता .३० दिंड्या दाखलविठेवाडी पाळे, नरु ळ, मेहदर, ओतूर, सुकापूर, रवळजी, भेंडी, गोपाळखडी आदी तालुक्यातील व परिसरातून विठ्ठल रुक्मिणीच्या भाविकांच्या ३० दिंड्या मंदिर परिसरात दाखल झाल्या होत्या. श्री विठोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील शिरोरे ,उपाध्यक्ष सुधाकर पगार ,सरचिटणीस जयंत देवघरे ,विश्वस्त अँड परशुराम पगार ,उपनगराध्यक्ष कौतिक पगार ,शिक्षक नेते कारभारी पगार, संजय मालपुरे ,अशोक जाधव ,हरिश्चंद्र पगार,कृष्णा पगार, के के शिंदे,भावराव पाटील, सुनील कोठावदे, डॉ पी एच कोठावदे,मोतीराम पगार, राजेंद्र पगार, शंकर निकम आदी पदाधिकारीनी दिंडीतील विठ्ठल भक्तांचे व विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत केले. दरम्यान, सकाळी कळवण शहरातून जानकाई विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पायी दिंडी काढली. विठ्ठल-रु क्मिणी च्या वेशातील बालकांचा रथ, हातात टाळमृदुंग , डोक्यावर पांढरीटोपी ,कुडता ,धोतर तसेच नऊवारी साडी या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी कळवणकरांचे लक्ष वेधून घेतले.रात्री ह. भ. प. नितीन महाराज मुडावदकर यांच्या जाहीर कीतर्नाचा कार्यक्र म झाला.

टॅग्स :Nashikनाशिक