लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीस गुरुवारी (दि.१२) अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग संचालनालयाचे सहायक अर्थशास्त्र सल्लागार संदीप कोते यांनी भेट दिली. सभापती सुवर्णा जगताप यांनी कांदा व्यापाऱ्यांना कांदा साठण्याची मर्यादा वाढवून देण्याची मागणी यावेळी कोते यांच्याकडे आली. यानंतर संदीप कोते यांनी कांदा लिलावाची पहाणी करून शेतकरी व व्यापारी यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी संदीप कोते यांनी सांगितले की, कांदासाठा मर्यादा वाढविणे अथवा रद्द करण्याबाबत कळविण्यात येईल. याप्रसंगी नरेंद्र वाढवणे, सुदीन टर्ले, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.
सहायक अर्थशास्त्र सल्लागारांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:04 IST