नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 14:36 IST2020-07-23T14:35:35+5:302020-07-23T14:36:38+5:30
नांदगाव : शहरातील बाजारपेठेत सुरू असलेली दुकाने, आस्थापना, सामाजिक अंतराची अंमलबजावणी, माक्सचा वापर होत नसल्याचे व शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा आस्थापना, दुकानदार व्यक्ती विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी कासार यांनी मुख्याधिकारी यांना दिले.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार
नांदगाव : शहरातील बाजारपेठेत सुरू असलेली दुकाने, आस्थापना, सामाजिक अंतराची अंमलबजावणी, माक्सचा वापर होत नसल्याचे व शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा आस्थापना, दुकानदार व्यक्ती विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी कासार यांनी मुख्याधिकारी यांना दिले.
शहरात कोरोना विषाणू बाधित रु ग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व स्थानिक अधिकारी यांनी पथकासह शहराची पहाणी करून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी शासनाचे आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी अशा सुचना देण्यात आल्या. शहरातील मध्यवर्ती भागात व परिसरात करोना विषाणू बाधित रूग्ण आढळत असल्याने रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पाशर््वभूमीवर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी येवला उपविभागीय अधिकारी सोपान कासार, मनमाड उपविभागीय अधिकारी समिरिसंग साळवे, तहसिलदार उदय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, मुख्याधिकारी डॉ.श्रीया देवचके यांनी पथकासह शहराची पहाणी केली.
याच पाशर््वभूमीवर गांधीचौक, फुले चौक, डॉ.आंबेडकर चौक, शिनमंदिर चौक या ठिकाणावरील रस्त्यावर आपली दुकाने थाटून व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना त्या ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी तात्पूरत्या स्वरूपात स्थलांतरीत केले जावे असा आदेशही यावेळी देण्यात आला. यानंतर मुख्याधिकारी देवचके यांनी नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेवून वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या आदेशांची व शासनाने दिलेल्या नियमांची शहरात कडक अंमलबजावणी करणेकामी नियोजन करण्यात आले. यावेळी तीन भरारी पथकांची नेमणुक करून कारवाईस सुरवात करण्यात आल्याचे देवचके यांनी सांगितले.
-------------------
पाच दुकाने सील
गेल्या चार दिवसात शहरातील बाजारपेठ व विविध ठिकाणी विना माक्स फिरणाºया ६९ व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर सामाजिक अंतर पालन न करणार्या पाच दुकानांना सील करण्यात आले. सदरची कारवाई ही कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी करण्यात येत असल्याने शहरातील जनतेने नियमांचे पालन करावे असे आवाहनही मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.