ठळक मुद्देखासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्र्यंबकेश्वर : दिशा समितीच्या सदस्यपदी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सारस्ते येथील इंजिनियर विनायक माळेकर व बाफनविहीरचे धीरज पागी यांची निवड झाली आहे.
याबद्दल दोघांचा खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे समाधान बोडके पाटील, मिथुन राऊत, रघुनाथ गांगोडे, अशोक लांघे, प्रकाश जाधव, लक्ष्मण बरफ, सुनील साबळे, सरपंच हरी खाडम, संतोष जाधव, चिंतामण बुधर, सुभाष बुधर आदी उपस्थित होते.