शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

तोडलेल्या झाडांजवळ ग्रामस्थांनी मांडला ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 20:59 IST

वेळुंजे : तालुक्यातील ठाणापाडा परिसरातील कास भागात शनिवारी (दि. २७) रोजी वनविकास महामंडळाच्या १२९ कंपाउंडमध्ये अज्ञात तस्करांनी दिवसाढवळ्या खैर जातीच्या झाडांची अवैध तोड केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी जोपर्यंत येऊन दोषींवर कारवाई करत नाही, तोपर्यंत तेथून न हलण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेत तस्करी होत असलेल्या झाडांजवळ ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून ठिय्या दिला आहे.

ठळक मुद्देकासमध्ये खैराच्या झाडांची कत्तल : दोषींवर कारवाईची मागणी

वेळुंजे : तालुक्यातील ठाणापाडा परिसरातील कास भागात शनिवारी (दि. २७) रोजी वनविकास महामंडळाच्या १२९ कंपाउंडमध्ये अज्ञात तस्करांनी दिवसाढवळ्या खैर जातीच्या झाडांची अवैध तोड केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी जोपर्यंत येऊन दोषींवर कारवाई करत नाही, तोपर्यंत तेथून न हलण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेत तस्करी होत असलेल्या झाडांजवळ ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून ठिय्या दिला आहे.हरसूल भागातील ठाणापाडा परिसरातील वनविकास महामंडळाच्या बोरीपाडा रेंजमधील कास येथील पावंधी कार्यक्षेत्रात शनिवारी (दि.२७) खैराच्या सात झाडांची तोड करण्यात आली आहे. त्यापैकी चार झाडे तोडून टाकण्यात आली आहेत तर तीन झाडे अर्धवट धोकादायक स्थितीत उभी आहेत. मात्र जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन दोषींवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत ग्रामस्थांनी तस्करी होत असलेल्या झाडाजवळ ठिय्या मांडला आहे. यामुळे वनविकास महामंडळाची पूर्णतः धावपळ उडाली आहे. हरसूलसारख्या भागांत वनविकास महामंडळामार्फत अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. मात्र कुंपणच शेत खात असल्याचे सांगत काससारख्या दुर्गम भागात अनेक वृक्षांना संबंधित विभागच कुऱ्हाड लावून सर्रास तोड करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेला चोवीस तास उलटूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी यादव पवार, जयवंत राऊत, पुंडलिक महाले, काळू वड, मधुकर महाले, नामदेव भुसारे, तुकाराम मोंढे, जाणू वड, रामदास चौधरी, तुळशीराम राऊत, रामदास पवार, देवराम अवतार, विष्णू शेंगे, राजू गोतरणे, भगवान बुधर, सखाराम बुधर, वनपाल अर्जुन किरकिरे, श्रीमती एम.आर. साळुंखे, वनरक्षक एन.एस. पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.खैर जातीच्या वृक्षांची तोड ही वनविकास महामंडळाकडूनच करण्यात आली आहे. मात्र त्यात कोण दोषी आहे, त्यासाठी वरिष्ठांची घटनास्थळी भेट महत्त्वाची असून दोन दिवसांपासून जवळपास २०० हून अधिक तस्करीच्या झाडांजवळ ग्रामस्थांनी ठिय्या दिला आहे. मात्र चोवीस तास उलटूनही अद्याप वरिष्ठ अधिकारी आलेले नाहीत.- यादव पवार, ग्रामस्थ, कासवनविकास महामंडळाने केलेली वृक्षतोड लाजिरवाणी बाब आहे. वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन त्याबरोबरच त्याचे संरक्षण करण्याची त्यांची जबाबदारी आहे. मात्र खैर जातीच्या सात झाडांच्या वृक्षतोडीने ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.- अर्जुन किरकिरे, वनपाल, वनविकास महामंडळफोटो- २८ हरसूल फॉरेस्टकास परिसरात खैर जातीच्या वृक्षाजवळ ग्रामस्थांनी दिलेला ठिय्या.

टॅग्स :forestजंगलCrime Newsगुन्हेगारी