शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

२२३ गावात एक गाव, एक गणपती उपक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:10 IST

ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला यंदा अभूतपूर्व यश आले असून, उपविभागातील नांदगाव, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तब्बल २२३ गावात एक गणपतीची स्थापना झाली असून, पोलिसांच्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे.

येवला : ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला यंदा अभूतपूर्व यश आले असून, उपविभागातील नांदगाव, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तब्बल २२३ गावात एक गणपतीची स्थापना झाली असून, पोलिसांच्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. ग्रामीण पोलीस दलात गणेशोत्सव मंडळांसाठी विघ्नहर्ता बक्षीस योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात आली आहे. यासाठी दराडे व डॉ. खाडे यांनी येवल्यात, मनमाडला येऊन मंडळाची बैठका घेतल्या. प्रत्येक पोलीस ठाणे पातळीवर गणेश मंडळ, डॉल्बी मालकांचे प्रबोधन करण्यात आले. स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकाºयांनीदेखील गावोगावी जनजागृती केली. अधीक्षक दराडे यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाला बळ देण्यासाठी गावागावात ‘एक गाव, एक गणपती’चा पुरस्कार करीत हा उपक्र म गावागावांत पोहोचविण्यासाठी पोलीस दलावर जवाबदारी दिली, ती मनमाड उपविभागात यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘‘गावांतील जास्त गणपतीमुळे होणारे वाद,गुन्हे,गटबाजी थांबून गावातील सामाजिक एकोपा,सलोखा राखावा हि भूमिका घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी येवला,मनमाडला बैठका घेऊन आम्हांला प्रेरणा दिली सर्व पोलीस अधिकारी,पोलीस पाटलांच्या बैठका घेऊन तंटामुक्त गावे करण्यासाठी एकच गणपतीची स्थापना करून असे आवाहन केले.मंडळानी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने येवला,मनमाड,नांदगाव या तालुक्यात यंदा विक्र मी गावात हा उपक्र म राबवला आहे.अश्या आदर्श मंडळातून विघ्नहर्ता बक्षीस योजनेचे मानकरी देखील निवडून त्यांना सन्मानित करणार आहोत.’’ -डॉ.राहुल खाडे,  पोलीस उपअधीक्षक,मनमाड उपविभागमनमाड पोलीस ठाण्याअंतर्गत १४३ लहान व मोठे मंडळ असून, १९ गावांत एक गाव, एक गणपती संकल्पना राबविली आहे. नांदगावमध्ये ८८ मंडळांपैकी ५० गावांत, चांदवडमध्ये ७४ मंडळांपैकी ३९ गावात ही संकल्पना राबविली गेली आहे. येवला शहर हद्दीतील छोटी-मोठी १३७ मंडळे असून, १९ गावांत तर येवला तालुक्यात तब्बल ७० गावांत एक गणपतीची स्थापना झाली आहे. वडनेरभैरव ठाणे अंतर्गत २६ गावात एक गणपती आहे. म्हणजेच नांदगाव, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तब्बल २२३ गावात एक गणपतीची स्थापना झाली असून, पोलिसांच्या प्रयत्नांचे हे विक्र मी यश मानले जात आहे. विशेष म्हणजे २०१६ मध्ये हाच आकडा फक्त ७७ तर २०१४ व २०१५ मध्ये ७० च्या आसपास होता. या आकड्यानुसार येवला तालुक्यात सर्वाधिक ८९ ,नांदगाव तालुक्यात ६९ तर चांदवड तालुक्यात ६५ गावांत हि संकल्पना यशस्वी झाली असल्याचे मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.राहुल खाडे यांनी सांगितले.