शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

विकास खुंटला : माळेगावच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

By admin | Updated: January 10, 2015 00:23 IST

मोकळ्या भूखंडासाठी उद्योगमंत्र्यांना साकडे

 सिन्नर : माळेगाव औद्योगिक क्षेत्र विकसित झाल्याने नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामपंचायत प्रशासनासमोर अनेक समस्या निर्माण होत असून, शाळा इमारत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व क्रीडांगण बांधकामाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार राजाभाऊ वाजे व माळेगावचे सरपंच तुकाराम सांगळे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन त्यांना एमआयडीसीकडून भूखंड उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे साकडे घातले.माळेगाव औद्योगिक वसाहतीसोबत गावात लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात काही समस्या निर्माण होत आहेत. ग्रामपंचायत हद्दवगळता सर्व परिसरातील सर्व भूखंड एमआयडीसीच्या ताब्यात आहेत. सदर भूखंड मिळावेत यासाठी आमदार वाजे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती सदस्य उदय सांगळे, सरपंच तुकाराम सांगळे, ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्यामुळे एमआयडीसीकडून भूखंड मिळावेत, अशी मागणी करण्यात आली. औद्योगिक वसाहतीमध्ये कच्च्या व पक्क्या मालाची वाहतूक करण्यासाठी मालट्रक येत असतात. यावरील चालकांना स्वच्छतागृहाची व पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. एमआयडीसीने वेगवेगळ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास ग्रामपंचायत स्वखर्चाने स्वच्छतागृह उभारू शकते, असे यावेळी सांगण्यात आले. माळेगाव - मापारवाडी ग्रामपंचायतीला १९९६ मध्ये ४० मि. मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली होती. माळेगावची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, सदर जलवाहिनी मोठी होण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले. उद्योगमंत्री देसाई यांनी पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले. तर भूखंडाबाबत स्वतंत्र प्रस्ताव देण्याची मागणी केली. (वार्ताहर)