शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

साथरोग नियंत्रणासाठी सतर्कतेचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:46 PM

हवामान खात्यामार्फत यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आपापल्या जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा इतिहास लक्षात घेऊन मान्सून काळात जिल्ह्यात कोणताही साथरोग आणि कोरोनाचा प्रादुर्भाव उद्भवणार नाही, याबाबत अधिक दक्षता बाळगण्याच्या सूचना विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

ठळक मुद्देआढावा बैठक : विभागीय आयुक्तांनी दिल्या नियोजनाच्या सूचना

नाशिक : हवामान खात्यामार्फत यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आपापल्या जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा इतिहास लक्षात घेऊन मान्सून काळात जिल्ह्यात कोणताही साथरोग आणि कोरोनाचा प्रादुर्भाव उद्भवणार नाही, याबाबत अधिक दक्षता बाळगण्याच्या सूचना विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी मान्सूनपूर्व तयारीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित विभागीय आढावा बैठकीत माने यांनी अधिकाऱ्यांना सतर्कचे आदेश दिले आहेत. यावेळी उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, अर्जुन चिखले, संगीता धायगुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे आदी उपस्थित होते.यावेळी विभागीय आयुक्तांनी ज्या जिल्ह्यांमध्ये पूर येण्याचा इतिहास आहे आणि चांगल्या पावसात नेहमीच अशी परिस्थिती उद्भवते त्यांनी संभाव्य पूरग्रस्त गावांची माहिती अद्ययावत ठेवावी, अशा सूचना बैठकीत केल्या.जिल्हानिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करण्यात यावेत, जिल्हास्तरावरील प्रत्येक विभागाने आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीप्रमाणे आपली माहिती अद्ययावत करावी,प्रत्येक जिल्ह्यातील मान्सूनपूर्व उपाययोजना संबंधित विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयाने राबवाव्यात, असे ते म्हणाले.महापालिकांना निर्देशप्रत्येक जिल्ह्यातील महानगरपालिकांमार्फत पावसाळा सुरू होण्यापूर्वी साथीचे रोग पसरू नये यासाठी आवश्यक औषधांची फवारणी करण्यात यावी, सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पावसाळ्यातील साथीचे रोग पसरू नये यासाठी पुरेसा औषधसाठा, पुरेशा रुग्णवाहिका, आरोग्य पथके याबाबत जिल्हा पातळीवर नियोजन करावे, अशा सूचना राजाराम माने यांनी दिल्या.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार