Vidya International School student first in district level weight lifting competition | विद्या इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी जिल्हास्तर वजन उचलणे स्पर्धेत प्रथम

विद्या इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी जिल्हास्तर वजन उचलणे स्पर्धेत प्रथम

ठळक मुद्देस्पर्धा नुकतीच मनमाड येथील छत्रे हायस्कूल येथे पार पडली.

येवला : क्र ीडा व युवक सेवा संचलनालय पुणे, जिल्हा क्र ीडा अधिकारी व जिल्हा क्र ीडा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुलीच्या १९ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय वजन उचलण्याची क्र ीडा स्पर्धा नुकतीच मनमाड येथील छत्रे हायस्कूल येथे पार पडली.
या स्पर्धेत विद्या इंटरनॅशनल शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थीनी मानसी लाड हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून ५९ किलो गटात जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
तिची भुसावळ येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली. मानसी हिच्या निवडीबद्दल विद्या संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेश पटेल, डॉ. संगीता पटेल, मुख्याध्यापक शुभांगी शिंदे, यांच्या सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतूक केले.
यशस्वी विद्यार्थिनीला जयभवानी व्यायाम शाळेचे मुख्य प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे तसेच शाळेतील क्र ीडाशिक्षक किरण कुलकर्णी, अजय पारखे, मोईज दिलावर यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Vidya International School student first in district level weight lifting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.