VIDEO : ट्रिपल तलाकविरोधात नाशिकमधील मुस्लिम महिलांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 17:21 IST2018-02-15T17:20:21+5:302018-02-15T17:21:13+5:30

केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेत मंजुर करण्यात आलेल्या तीन तलाक कायद्याच्या विरोधात आज दुपारी अडीच वाजता शहरातील मुस्लिम महिलांचा एटीटी हायस्कूल पासून विराट मोर्चा काढण्यात आला.

VIDEO: Muslim women's front in Nashik against Triple divorce | VIDEO : ट्रिपल तलाकविरोधात नाशिकमधील मुस्लिम महिलांचा मोर्चा

VIDEO : ट्रिपल तलाकविरोधात नाशिकमधील मुस्लिम महिलांचा मोर्चा

मालेगाव (नाशिक)- केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेत मंजुर करण्यात आलेल्या तीन तलाक कायद्याच्या विरोधात आज दुपारी अडीच वाजता शहरातील मुस्लिम महिलांचा एटीटी हायस्कूल पासून विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळाचे सचिव मौलाना उमरैन महेफुज रहेमानी यांनी केले. मोर्चात मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.

 यावेळी माजी महापौर ताहेरा शेख रशीद, नगर सेविका शान ए हिंद यांच्यासह सहा महिलांच्या वतीने अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी मागणीचे निवेदन स्विकारले. यावेळी महापौर रशीद शेख, आमदार आसिफ शेख, माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल, माजी महापौर अब्दुल मलिक, यांच्यासह सर्व राजकीय पक्ष नेते, सर्व पंथीयांचे प्रमुख मौलाना, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती हजर होते.

Web Title: VIDEO: Muslim women's front in Nashik against Triple divorce