दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या पर्सची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 18:12 IST2018-11-17T18:12:33+5:302018-11-17T18:12:53+5:30
नाशिक : पंचवटीतील गोदाघाटावरील साती आसरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) दुपारच्या सुमारास ...

दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या पर्सची चोरी
ठळक मुद्दे पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल
नाशिक : पंचवटीतील गोदाघाटावरील साती आसरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) दुपारच्या सुमारास घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव स्टॅण्डवरील एकल अपार्टमेंटमधील रहिवासी कस्तुरी लुटे (पिंगळे) या दुपारी दीड वाजेच्या सुमारास गोदाघाटावरील साती आसरा मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यांनी आपली पर्स मंदिराच्या खिडकीजवळ ठेवली असता चोरट्यांनी सदर पर्स चोरून नेली़ या पर्समध्ये दोन मोबाइल व पाचशे रुपये रोख असा ऐवज होता़
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.