शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

पिंपळगावी पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला महिलेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 18:26 IST

पिंपळगाव बसवंत : परिसरातील अंबिका नगर तेथील महिलेला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन ६५ वर्षीय महिलेचा बळी घेतला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुत्र्याच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देमोकाट कुत्र्याचा बंदोबस्त लावण्यात अपयश

पिंपळगाव बसवंत : परिसरातील अंबिका नगर तेथील महिलेला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन ६५ वर्षीय महिलेचा बळी घेतला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुत्र्याच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सविस्तर घटना अशी की, शनिवारी (दि.१) अंबिका नगर येथील शांताबाई संतोष पगार (६५) या रस्त्याने जात असताना एका मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्या पायाचे लचके तोडत त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेनंतर नागरीकांनी त्यांना तात्काळ पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.तेथील प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर २० दिवस उपचार सुरू होते. रविवारी (दि.२४) त्यांना एका खाजगी रु ग्णालयात नेले असता डाक्टरांनीॅ त्यांना पुन्हा जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. व सोमवारी (दि.२५) त्यांना जिल्हा रुग्णालयात नेताना त्यांंचे निधन झाले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.चौकट.....आई-वडिलांविना मुले झाली पोरकी...२० वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर शांताबाई यांनी मोलमजुरी करून आपल्या दोन मुली व मुलाचे संगोपन करून त्याना वाढविले, त्यांचे लग्न करून दिले व आपल्या मुला व नातवंडांसोबत समाधानाने दिवस काढत असताना त्यांना पिसाळलेल्या कुत्रा चावल्याने त्यांना मृत्यू झाल्याने कुटूंबावर मोठा आघात झाला आहे.मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त लावण्यात अपयशपिसाळलेले श्वान अजूनही परिसरात मोकाट असून वाहनाचालक व पायी जाणाऱ्या नागरिकांवर ते धशवून जात असल्याने डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या पिसाळलेल्या कउत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पण या घटनेला २५ दिवस होऊनही कुत्र्याचा बंदोबस्त लावायला प्रशासनाला मुहूर्त सापडत नाही.कोट....शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे दिसते. नाशिक शहरातून महापालिकेने पकडलेली मोकाट कुत्री पिंपळगाव बसवंत हद्दीत आणून सोडली जातात, अशी शहरात चर्चा आहे. यांची माहिती घेऊन संबंधित विभागाची तक्र ार करणार आहे.- गणेश बनकरग्रामपंचायत सदस्य, पिंपळगाव बसवंत.पिसाळलेल्या कुत्र्याने आतापर्यंत अनेक जणांवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. व एका महिलेला देखील आपला जीव गमवावा लागला आहे. तरीही येथील स्थानिक प्रशासन मूग गिळून आह.े ही मोठी शोकांकिता आहे. अजून मोठा प्रसंग ओढू नये म्हणून त्वरीत शहारातील मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे.- उद्धवराजे शिंदे, नागरिक. 

टॅग्स :dogकुत्राDeathमृत्यू